*ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व तनिषाकडे*
*ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व तनिषाकडे* *पुणे, १० ऑगस्ट:* नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर १२ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या १६ व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये कोल्हापूरची फॉरवर्ड खेळाडू तनिषा शिंदे ही १८ सदस्यीय हॉकी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. हॉकी इंडियाचे असोसिएट उपाध्यक्ष आणि हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी या संघाची घोषणा केली. मुंबई 'साई' केंद्राची डिफेंडर आकांक्षा पाल हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशातील आघाडीचे ज्युनियर महिला संघ १२ दिवसीय स्पर्धेसाठी पिंपरी येथे एकत्र येत असताना महाराष्ट्र संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल. या राज्य संघात पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, नाशिक, यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यातील तसेच 'साई' केंद्रांमधील खेळाडूंचा समावेश आहे. हॉकी महाराष्ट्र १८ सदस्यीय संघात दोन गोलकीपर, पाच डिफेंडर, सहा मिडफिल्डर आणि पाच फॉरवर्ड खेळाडूंचा स...