अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली*

*अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली*  

आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे २६/११ मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवाना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहिदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा या एन एन एस स्वयंसेवकांनी केली.   
संस्थापक राजीव जगताप यांनी भारत मातेला समृद्ध करण्यासाठी आजच्या तरुणांनी 26 / 11 मध्ये शहीद झालेल्या जवानांचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले तर संविधान दिनानिमित्त संविधानाचे सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करून ते जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
        कार्यक्रम अधिकारी 
विनोदकुमार बंगाळे आणि स्वाती काळे यांनी सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एन एस एस स्वयंसेवकांच्या सहकार्याने उपक्रम राबवला. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप , उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे,प्राचार्या वर्षा शर्मा,उपस्थित होते.
 *फोटो ओळ :अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचनही करण्यात आले.*

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत