भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत



इकडे आड आणि तिकडे विहीर
एकीकडे पोलीस प्रशासन *भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत* तर दुसरीकडे ऑनलाइन *लिव्ह अँड लायसन्स भाडेकराराचे रजिस्टर केलेले 6500 दस्त चे रजिस्ट्रेशन गेली पंधरा ते वीस दिवस प्रलंबित असल्याची* व दस्त रजिस्टर करने साठी पैशाची मागणी होत असल्याचे प्रकारा घडत असल्याचे तक्रार असोसिएशनने DIG न कडे केली आहे
*ऑनलाइन दस्त रजिस्टर करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक तसेच सेवा पुरवठादार यांना असोसिएशनच्या वतीने आव्हान करण्यात येते की कोणीही या कामासाठी पैसे देऊ नयेत कोणी पैशाची मागणी केली तर असोसिएशनला कळवावे*


*विषय:- नोंदणी विभागाचा नागरिकांना मनस्ताप ऑनलाइन लिव्ह अँड लायसन्स भाडेकराराचे 6500 दस्त प्रलंबित,*

देश भारातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, देशभरातून आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात येणारा नोकरदार वर्ग ,एमपीएससी यूपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी येणारे विद्यार्थी यांची वाढती संख्या त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहणे सोयीचे असल्याने पुणे शहरात लिव्ह अँड लायसन्स तत्वावर घर भाड्याने घेवून राहणाऱ्या सख्या प्रचंड आहे 
            संपूर्ण देशात महाराष्ट्र मध्ये भाडे करारासाठी सक्षम भाडे नियंत्रण कायदा असल्याने लीव्ह अँड लायसन तत्त्वावर ऑनलाइन भाडेकरार करून घण्याचा कल वाढला असून महसूल खात्याला रोज अंदाजे 4000 पेक्षा जास्त दस्त नोंदणी होत असून 50 हजार करोड रुपयाचा महसूलात भाडे करारातून येणाऱ्या महसुलाचे प्रमाण लक्षणीय आहे आरटीई प्रवेश करण्याकरता रहिवासी पुरावा, बँक खाते उघडण्यासाठी चा रहिवासी पुरावा, दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करताना लागणारा रहिवासी पुरावा, भाडेतत्त्वावर घेतलेल्या व्यवसायिक जागेसाठी GST साठी लागणारा पुरावा, मेडिकल आणि आरोग्य विषयक व्यवसायासाठी लागणाऱ्या लायसन्स साठी लागणारा पुरावा तसेच भाडेतत्त्वावर राहण्यासाठी च्या सोसायटीमध्ये प्रवेशा करता लागणारा पुरावा, पासपोर्ट काढण्यासाठी रहिवाशी पुरावा, विवाह नोंदणी करण्यासाठी रहिवाशी पुरावा, जेवण बनविण्या करिता लागणारा गॅस घेण्यासाठी सुद्धा अश्या अत्यंत महत्वाच्या कामासाठी कायदेशीर रहिवाशी पुरावा म्हणून ऑनलाइन लिव्ह अँड लायसन्स भाडेकरार ग्राह्य धरला जातो
             पुणे व पिंपरी चिंचवड मधील 1ते 27 दुय्यम निबंधकां मार्फत तसेच नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फक्त भाडेकरारासाठी असलेल्या हवेली क्रमांक 28 मधील दुय्यम निबंधक मार्फत अधिकृत सेवा पुरवठादार तसेच सर्वसामान्य नागरीका कडून ऑनलाइन पद्धतीने जमा केलेले दस्त भरलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी फी व इतर बाबतीत आवश्यक ती ऑनलाईन सादर केलेली कागदपत्रे तपासून त्यावर दुय्यम निबंधक याचा हाताचा ठसा देऊन कार्यालयाचा शिक्का, दस्त क्रमांक, दिनांक ऑनलाईन पद्धतीने नोंदवून दस्त नोंदवला जातो. 
            सध्या पोलीस वेरिफिकेशन न केलेल्या घरमालक आणि भाडेकरू यांच्यावर गृह खात्याकडून आदेश आल्याने पोलीस खाते अलर्ट मोडवर आले असून ज्यांनी पोलीस वेरीफिकेशन अथवा ऑनलाइन भाडेकरार केलं नाही अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सर्वसामान्यान कडून भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच दुय्यम निबंधक यांच्याकडून दस्त तपासून रजिस्टर करण्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवली जात आहे दहा ते पंधरा सब रजिस्टर ऑफिस मध्ये प्रत्येकी 1000 ते 1500 दस्त पेंडिंग आहेत ज्यांना दस्त लवकर रजिस्टर करून हवा आहे त्यांना पैशाची मागणी होत असल्याचे अनेक तक्रारी असोसिएशनकडे आले आहेत या संदर्भात DIG पुणे श्री अभयसिंह मोहिते सर यांची भेट घेऊन असोसिएशनने तक्रारीचा पाढा वाचला आणि सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या त्यांनी आठवड्यात कामकाज पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न व सामान्य नागरिकांना करीता अजून अधिक नवीन सुविधा निर्माण करणार असल्याचे सांगितले. सदरचे शिष्टमंडळात अध्यक्ष सचिन शिंगवी सह मंगेश पाटील, उपस्थित होते

आपला नम्र
श्री. सचिन शांतीलाल शिंगवी
अध्यक्ष :- असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्ह्याडर, महाराष्ट्र राज्य, पुणे (ASP)
9850222880

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ