अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व शैक्षणिक स्कॉलरशिप प्रदान*शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा व गुरुजनांचा आदर्श ठेवावा - मेधा कुलकर्णी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व शैक्षणिक स्कॉलरशिप प्रदान *शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा व गुरुजनांचा आदर्श ठेवावा - मेधा कुलकर्णी* २९ जून रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्यातर्फे दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, तसेच समाजातील गरीब हुशार मुलांना भगवान परशुराम शैक्षणिक स्कॉलरशिप देण्याचा कार्यक्रम केसरी वाडा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या 175 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच ब्राह्मण समाजातील १८ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली उद्देश फक्त हाच होता कि केवळ फी अभावी मुलांचे शिक्षण थांबू नये. या कार्यक्रमासाठी राज्यसभेच्या खासदार डॉ. सौ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी,युवा नेते कुणाल टिळक , डॉ. महेश चिटणीस ,एमआयटी कॉलेज चे श्री रत्नदीप जोशी, प्राचार्य वंदन जोशी असे मान्यवर तसेच पुणे जिल्हाध्यक्ष श्री मंदार रेडे, ...