सांस्कृतिकदृष्ट्या वर्ष सुखसमृद्धीचे जावो’नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

सांस्कृतिकदृष्ट्या वर्ष सुखसमृद्धीचे जावो’

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि रसिकांना त्यांचा भरभरून आनंद घेता यावा. कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिक यांना सांस्कृतिकदृष्ट्या हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्‌ध अभिनेते आनंद इंगळे यांनी दिल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गुरुवारी (दि. १९) कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंत गुढी उभारण्यात आली. त्या वेळी सोमण आणि इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते सारंग मांडके, सारंग भोईरकर यांच्यासह नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, अनुराधा हटकर, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात समीर हंपी यांनी उपक्रमाविषयी माहिती विशद केली तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले. कलाकरांचा सत्कार सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, सुनील महाजन, अनुराधा हटकर, गणेश भोसले यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल, योगेश सोमण, सुनील महाजन यांचा सत्कार आनंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य