पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी
ENGLISH
पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडे
विफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी
पुणे, ६ नोव्हेंबर, २०२४: धुळे येथे खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य (विफा) आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत पूना जिल्हा फुटबॉल संघटनेचे (पीडीएफए) ज्युनियर (मुले ) संघाचे नेतृत्व बचावपटू श्रीतेज पवारकडे सोपविण्यात आले आहे.
स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली . मात्र, पुणे संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आले आहे.
धुळ्याला रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पीडीएफएचे सचिव प्रदीप परदेशी यांनी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली.
गुरुवार (७ नोव्हेंबर २०२४) बाद फेरीतून (नॉक-आउट) पुणे संघ त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल.
*संघ* -
गोलरक्षक: प्रबोध शेजवळकर, स्पंदन कांदे.
बचावपटू (डिफेंडर): विहान कार्तिक, आयुष विश्वजीत चव्हाण, इव्हान कोलंकड, आर्यवर्धन काकडे, इथन लोबो, आरव वानखडे, श्रीतेज पवार, क्षौनीश कर्णप्रकाश पिल्ले.
मिडफिल्डर: परम कुलकर्णी, विश्व भारसाकळे, पार्थ प्रसाद शिंदे, नैतिक गुप्ता, राजवीर प्रमोद सिंग, सौरज्यो गुप्ता.
फॉरवर्ड: उस्मान फर्निचरवाला, कृतार्थ कृणाल बाउस्कर.
Comments
Post a Comment