अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड तर्फे 4,400 दशलक्ष रु. ची प्राथमिक समभाग विक्री 24 मार्च 2026 रोजी खुली होणार
अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड तर्फे 4,400 दशलक्ष रु. ची प्राथमिक समभाग विक्री 24 मार्च 2026 रोजी खुली होणार
· 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअर साठी (“इक्विटी शेअर”) किंमतपट्टा 201 रु. ते 212 रु. निश्चित
· बोली मंगळवार 24 मार्च 2026 रोजी सुरु होईल आणि शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिनांक सोमवार, 23 मार्च 2026 असणार आहे.
· बोली प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 70 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी शेअर्सच्या पटीत करता येतील.
राष्ट्रीय, 19 मार्च 2025: अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड (the “Company”) आपली इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री संदर्भातील बोली/ इश्यू मंगळवार 24 मार्च 2026 रोजी खुली करणार असून शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी बंद होणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे 4,400 दशलक्ष रु. चा फ्रेश इश्यू आहे.
आतापर्यंत 10 रु. दर्शनी मूल्य असलेले 82,796,840 इक्विटी शेअर्स आहेत.
कंपनीने अंदाजे 4,400 दशलक्ष रु. इतक्या निव्वळ निधीचा उपयोग आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (एकत्रितपणे, the “Object of Issue”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“Book Running Lead Managers” किंवा “BRLMs”) आहेत. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
कंपनीचे इक्विटी शेअर्स 12 मार्च 2026 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे (“RHP”) रजिस्ट्रार ऑफ कंपनिज, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली-II, सेंट्रल दिल्ली (the “RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले असून हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
Comments
Post a Comment