२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून
*२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून*
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे.
तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार असून, शास्त्रीय गायन, वादन, नाट्यसंगीत आणि नृत्य यांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा :
२० मार्च रोजी सायंकाळी ‘स्वराभिषेक’ या संकल्पनेतून नाट्यभाव भक्ती संगीताची विशेष मैफल सादर होणार आहे. यामध्ये राजयोग धुरी, विश्वजित मैत्रेयी, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आदी कलाकार सहभागी होणार आहेत.
२१ मार्च रोजी सकाळी ९ वा. च्या सत्रात शर्वरी दिघेकर-फोकळे यांचे गायन, पार्थ भुमकर व प्रथ्मेश तारळकर यांचे जुगलबंदी सादरीकरण आणि श्रुती ढोकळकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता पं. राम शंकर, डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम (व्हायोलिन) यांचे सादरीकरण रंगणार आहे.
२२ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सत्रात निवेद व्यास, अनुपम जोशी (सरगम) आणि जयंत केजकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात नयनिका घोष यांचे कथक नृत्य, पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन आणि विदुषी डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
Comments
Post a Comment