के.ई.एम हॉस्पिटल, पुणे आणि स्पायना बिफिडा असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे स्पायना बिफिडा जागरूकतेसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आणिवैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन
के.ई.एम हॉस्पिटल, पुणे आणि स्पायना बिफिडा असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे स्पायना बिफिडा जागरूकतेसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आणिवैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन
पुणे,10 मार्च 2026
के.ई.एम. रुग्णालय, पुणे आणि स्पायना बिफिडा असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने, स्पायना बिफिडा या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांच्या मदतीसाठी शनिवारी 'मोफत तपासणी शिबिर' हे केईएम हॉस्पिटल येथे २१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते १ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये मुत्रविकारतज्ञ,बालरोगतज्ञ,अस्थिरोगतज्ञ,बालरोग मुत्रपिंडविकार तज्ञ आणि मानसोपचारतज्ञ अशी बहुशाखीय टीम सल्ला व मार्गदर्शनासाठी उपलब्ध असेल. तसेच २२ मार्च २०२६ रोजी रविवारी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात स्पायना बिफिडा चे व्यवस्थापन व उपचार करणारे तज्ञ एकत्र येतील.
स्पायना बिफिडा हा आजार जन्मजात असतो. बाळ पोटात असताना त्याच्या पाठीच्या कण्याचा हाडांचा सांगाडा पूर्णपणे तयार न झाल्यामुळे तिथे एक फट किंवा पोकळी राहते. या फटीमुळे पाठीचा कणा आणि तिथल्या नसा उघड्या पडतात किंवा त्यांना इजा होते. काही मुलांमध्ये पाठीवर मधोमध एखादी गाठ किंवा सूज दिसू शकते. कधीकधी ही फट त्वचेने झाकलेली असते, त्यामुळे ती बाहेरून लगेच लक्षात येत नाही. कधी-कधी या विकृती मुळे, जसजसे मूल मोठे होतात आणि त्यांची उंची वाढते, तसतसा पाठीचा कणा ताणला जातो आणि या आजाराची लक्षणे अधिक प्रकर्षाने जाणवू लागतात. याचा परिणाम पायांच्या, लघवीच्या आणि शौचाच्या जागी असलेल्या नसांवर होत असल्याने, यामुळे पायांमध्ये ताकद कमी होऊ शकते किंवा ताठरपणा येऊ शकतो. काही मुलांमध्ये वारंवार लघवीचा संसर्ग होऊ शकतो, ज्याचा परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यावर होऊ शकतो. तसेच, लघवीच्या पिशवीतील वाढलेला दाब थेट मूत्रपिंडापर्यंत पोहोचल्यामुळे देखील मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
Comments
Post a Comment