महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडच्या एमएसआयएफकडून एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड लाँच



 

 

महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडच्या एमएसआयएफकडून एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड लाँच


(डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून इक्विटी आणि डेटमध्ये मर्यादित शॉर्ट एक्सपोजरसह इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणारी इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी)

 

बाजारपेठ चक्रांमधील संधींचा लाभ घेण्यासाठी निश्चित उत्पन्न आणि आर्बिट्राजसह लाँग व शॉर्ट पोझिशन्सची लवचिकता एकत्र आणणारे अनुकूल हायब्रिड धोरण

 

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२६: महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडने आज एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडच्या (‘इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी') लाँचची घोषणा केली. ही इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे, जी डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून इक्विटी आणि डेटमधील मर्यादित शॉर्ट एक्सपोजरसह इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते. ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी महिंद्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडचा स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) प्लॅटफॉर्म एमएसआयएफ अंतर्गत सादर करण्यात आली आहे.

 

या योजनेची न्यू फंड ऑफर (एनएफओ) २७ नोव्हेंबर २०२६ रोजी उघडेल आणि ११ डिसेंबर २०२६ रोजी बंद होईल. ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी २१ डिसेंबर २०२६ पासून सातत्यपूर्ण खरेदी आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल.

पोर्टफोलिओ पोझिशनिंगची लवचिकता हे या फंडाचे मुख्य वेगळेपण आहे. पारंपारिक लाँग-ओन्ली हायब्रिड फंडाच्या तुलनेत-जो केवळ इक्विटी एक्सपोजर कमी करून बाजारपेठेबद्दल सावध दृष्टिकोन व्यक्त करू शकतो. एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड आपल्या गुंतवणूक दृष्टिकोनाचा भाग म्हणून निव्वळ मालमत्तेच्या २५ टक्‍क्‍यांपर्यंत अनहेज्ड शॉर्ट पोझिशन्स घेण्याचे, विहित नियामक मर्यादेच्या अधीन राहून ऑप्शन स्ट्रॅटेजीजचा वापर करण्याचे आणि आयपीओ, बायबॅक, विलीनीकरण, विलगीकरण इत्यादी विशेष परिस्थितींमध्ये सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवतो. यामुळे गुंतवणूक टीमला इक्विटी आणि निश्चित उत्पन्नातील मुख्य वाटप कायम राखत विविध बाजारपेठ परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी अधिक व्यापक साधने मिळतात.

 

हायब्रिड लाँग-शॉर्ट स्ट्रॅटेजी दोन पूरक दृष्टिकोन एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवते. स्थिरता दृष्टिकोन, ज्यामध्ये डेट आणि मनी मार्केट साधने, तसेच कॅश-फ्युचर्स आर्बिट्राजचा समावेश आहे, ज्यामुळे पोर्टफोलिओतील चढ-उतार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. वाढीव परतावा क्षमता दृष्टिकोन निवडक लाँग आणि शॉर्ट धोरणे, कव्हर्ड कॉल्स, स्ट्रॅडल्स, स्ट्रँगल्स आणि ऑप्शन स्प्रेड्स यांसारख्या डेरिव्हेटिव्ह धोरणांचा, तसेच अतिरिक्त जोखीम-समायोजित परतावा मिळवून देण्यास मदत करू शकणाऱ्या विशेष परिस्थितीतील संधींचा वापर करतो.

 

प्रस्तावित पोर्टफोलिओ रचना दृष्टिकोनानुसार, ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आर्बिट्राज पोझिशन्ससह इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये ६५ ते ७५ टक्‍के; टी-बिल्स, सीडी, सीपी, जी-सेक, एसडीएल आणि कॉर्पोरेट बाँड्स यांसारख्या डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये २५ ते ३५ टक्‍के आणि इनव्हिट्समध्ये (InvITs) १० टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक करेल. इक्विटीमध्ये, गुंतवणूक टीम बाजारपेठेच्या दृष्टिकोनावर आधारित ग्रॉस इक्विटी आणि आर्बिट्राज दरम्यान गतिमानपणे बदल करण्याचे उद्दिष्ट ठेवते, जिथे बाजारपेठेचा कल सकारात्मक असेल तेव्हा निव्वळ इक्विटी एक्सपोजर वाढवणे आणि दृष्टिकोन सावध झाल्यास आर्बिट्राजकडे वळणे असे हे धोरण असेल. प्रस्तावित वाटप सूचक आहे, जे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट आणि लागू नियमांच्या अधीन आहे.

 

या लाँचबाबत मत व्यक्त करत महिंद्रा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ अँथनी हेरेडिया म्हणाले: “स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स म्युच्युअल फंडांच्या नियामक आणि प्रकटीकरण चौकटीत अत्याधुनिक गुंतवणूक धोरणे आणून गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी उघडतात. एमएसआयएफ हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडसह आम्ही निश्चित उत्पन्न आणि आर्बिट्राजला लाँग आणि शॉर्ट इक्विटी पोझिशन्सच्या लवचिकतेची जोड देणाऱ्या अनुकूल, बहुआयामी दृष्टिकोनाद्वारे हायब्रिड गुंतवणुकीला पुढे नेत आहोत. हे व्यापक गुंतवणूक साधन सर्व बाजारपेठ चक्रांमध्ये इक्विटी सहभाग शोधत असताना बदलत्या बाजारपेठ परिस्थितींना प्रतिसाद देण्याची लवचिकता प्रदान करते.”

 

गुंतवणूक निर्णय तीन-स्तरीय प्रक्रियेचे पालन करतात. व्याजदर, महागाई, विकास दर, निधी प्रवाह, तरलता आणि भू-राजकीय जोखीम यांचा समावेश असलेले मॅक्रो अॅनालिसिस पोर्टफोलिओचे निव्वळ एक्सपोजर निश्चित करण्यास मदत करेल. समभागांची निवड टॉप-डाऊन आणि बॉटम-अप संशोधनाचा मेळ घालेल, ज्यामध्ये मूल्यांकनातील तफावत आणि संभाव्य उत्प्रेरक घटक ओळखण्यासाठी वाढ, मूल्यांकन, रोख प्रवाह आणि व्यवस्थापनाची गुणवत्ता यांचे मूल्यमापन केले जाईल. या प्रक्रियेला जोखीम व्यवस्थापनाचे पाठबळ आहे, जे एकल-समभाग आणि क्षेत्र मर्यादा, समभाग-स्तरीय आणि पोर्टफोलिओ हेज आणि ड्रॉडाउन ट्रिगर्ससह जोखीम सुरक्षा उपाय लागू करते.

 

महिंद्रा मॅन्युलाईफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे इक्विटीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर कृष्णा संघवी म्हणाले: “इक्विटी, आर्बिट्राज आणि शॉर्ट संधींमध्ये इक्विटी पोर्टफोलिओची गतिमान मांडणी करणे हा आमचा दृष्टिकोन आहे. प्रत्येक शॉर्ट पोझिशन लाँग पोझिशनप्रमाणे शिस्‍तबद्ध संशोधनाने घेतली जाते, ज्याला विकास, रोख प्रवाह, व्यवस्थापन आणि मूल्यांकन यांसारख्या मापदंडांचा समावेश असलेल्या आमच्या अंतर्गत गुंतवणूक आराखड्यावरील स्पष्ट प्रेरक घटकाचे पाठबळ असते. हालचालीची दिशा वेगळी असू शकते, पण गुंतवणूक प्रक्रिया आणि पोर्टफोलिओ शिस्त तीच राहते. निश्चित उत्पन्न पोर्टफोलिओ दृष्टिकोन आणि निश्चित जोखीम मर्यादांसह, सर्व बाजारपेठ चक्रांमध्ये सहभागी होऊ

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत