विद्यार्थिनींच्या आत्मसंरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचा उत्साहात शुभारंभ!
# विद्यार्थिनींच्या आत्मसंरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचा उत्साहात शुभारंभ!
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्मसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना स्वसंरक्षणाची कौशल्ये आत्मसात करता यावीत तसेच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता विकसित व्हावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. कराटे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता, शिस्त आणि प्रसंगावधान या गुणांचा विकास होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी प्रशालेतील सर्व पर्यवेक्षक तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. संचलगावत उपस्थित होते.
माननीय प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.
या सर्व शैक्षणिक, क्रीडा व विद्यार्थी विकासाभिमुख उपक्रमांना संस्थेचे माननीय सेवा समिती अध्यक्ष श्री. पराग ठाकूर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत असते.
Comments
Post a Comment