महिलांच्या त्यागामुळे धर्म आणि संस्कृतीचे जतन*डॉ. ओमेंद्र रत्नू यांचे प्रतिपादन ; राजपूत समाजातील सर्व कुळे व शाखांसाठी भारत देशातील प्रथम राजभाट - राव भाट संमेलनाचे आयोजन
*महिलांच्या त्यागामुळे धर्म आणि संस्कृतीचे जतन* डॉ. ओमेंद्र रत्नू यांचे प्रतिपादन ; राजपूत समाजातील सर्व कुळे व शाखांसाठी भारत देशातील प्रथम राजभाट - राव भाट संमेलनाचे आयोजन पुणे : आज आपण हिंदू आहोत ते महिलांच्या त्यागामुळे आहोत. शत्रू जेव्हा किल्ल्यावर चाल करून येत असे, तेव्हा स्त्रिया शत्रूच्या कैदेत किंवा अत्याचाराला सामोरे जाण्याऐवजी सामूहिक अग्निप्रवेश करून जोहर करीत. त्यांच्या या त्यागातून शौर्य, स्वाभिमान आणि संस्कृतीच्या जतनाचे महत्त्व दिसून येते. आजच्या काळात महिलांनी आपली शक्ती ओळखणे आवश्यक आहे. महिला आपली शक्ती ओळखणार नाहीत, तोपर्यंत धर्माचे जतन होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राजस्थानचे इतिहास अभ्यासक डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी केले. श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात बिबवेवाडी पुणे च्या वतीने राजपूत समाजातील सर्व कुळे व शाखांसाठी राज भाट संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मंदिराच्या सभामंडपात आयोजित संमेलनाला समाजातील विविध कुळे व शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी यज्ञदत्त हजारे, समस्त राजपूत महिला संघाच्या अध्यक्षा मिनल हजारे, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा चे महाराष्ट्...