आंदोलनासाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेल्या एस. एम. जोशी पुलाबाबत....

प्रती,
मा. अमितेशकुमार,
पोलीस आयुक्त, पुणे.
विषय - आंदोलनासाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेल्या एस. एम. जोशी पुलाबाबत....
मा. महोदय,
गुरुवार दि. 1 ऑक्टोबर पासून गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पुल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तेथील पोलिसांकडून माहिती घेतली असता एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सदर पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या अनुषंगाने काही प्रश्न पडत असून आपण याबाबत योग्य खुलासा करावा ही विनंती.
1) सदर आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे कां ?
2) दिली असल्यास हा चुकीचा पायंडा पडत आहे असे वाटत नाही कां ? उद्या अन्य एखाद्या संघटनेने, राजकीय पक्षाने २/४ दिवस एखादा रस्ता किंवा म्हात्रे पुल वा तत्सम ठिकाणी अशी परवानगी मागितल्यास ती देणार कां ?
3) सदर आंदोलन किती काळ चालणार आहे ? एखाद्या शासकीय कार्यालयासमोर ( जिल्हाधिकारी कार्यालय, विधान भवन ) किंवा मैदानात हे आंदोलक हलवून सामान्य पुणेकरांना दिलासा देता येईल कां ? 
कायदा, सुव्यवस्था राखत,सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू ठेऊन आपण योग्य कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो - 9850999995

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा