संविधानिक कर्तव्यांना मुठमाती' देणाऱ्या सत्ताघिशां कडून, आजन्म सत्तेसाठी वन नेशन,वन इलेक्शनचा हव्यास..!* ' *विधेयकास' न्यायव्यवस्थेचे कवच घेण्याचा केविलवाणा प्रयत्न..!* *- काँग्रेसची प्रखर टीका*

*'संविधानिक  कर्तव्यांना मुठमाती' देणाऱ्या सत्ताघिशां कडून, आजन्म सत्तेसाठी वन नेशन,वन इलेक्शनचा हव्यास..!* 
' *विधेयकास' न्यायव्यवस्थेचे कवच घेण्याचा केविलवाणा प्रयत्न..!*
    *- काँग्रेसची प्रखर टीका* 
पुणे दि ३ आक्टों 
 ⁃ देशात लोकशाहीस अभिप्रेत संविधानीक कर्तव्यांना.. सतत मुठमाती द्यायची, स्वायत्त संस्था अंकीत करायच्या, देश व राज्यास ४ पटीने कर्जबाजारी करायचे व कायदेशीर कारवाई'च्या भिती पोटी, याच अंकीत निवडणुक आयुक्तांच्या माध्यमातून पुढे आजन्म सत्तेत टिकून राहण्यासाठी "१_नेशन_१ईलेक्शन" चा घाट घालायचा हे भाजप'च्या शिर्ष नेतृत्वाचे मनसुबे लपुन राहीलेले नसून, त्यासाठी चाललेला प्रयत्नच् "भाजप - एनडीए महायुती"ची सत्तेची लोलुपता स्पष्ट करत असल्याची प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस'चे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..! 
 ⁃ ते पुढे म्हणाले की, 
 ⁃ "१_राष्ट्र_१_निवडणुक" संदर्भात भाजप प्रणीत एनडीए ने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचे अध्यक्षते खाली समिती नेमली, तरी देखील संसदेत व संसदे बाहेर सर्वत्र होणाऱ्या विरोधास नजुमानता, बेदरकारपणे व निर्ढावले पणाने,  'विधी व संविधानिक संकेत पायदळी तुडवत'.. 
 ⁃ 'सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं'चे (?) सोबत
 ⁃ "संयुक्त संसदीय समिती"(JPC)ची चर्चा - बैठक' आयोजित करणे पर्यंत त्यांची मजल गेली व मंगळवार दि ६ आक्टों रोजी दु ३.४० वा दिल्लीत बैठकीचे फर्मान ही निघाले. ही बाब अतिशय आक्षेपार्य असुन 'संविधानीक संकेत, न्याय_व्यवस्थेची मर्यादा व स्वायत्ततेचे' उल्लंघन करणारी असल्याचे त्यांनी सांगितले. 
 ⁃ संसद कायदे बनवते व सर्वोच्च न्यायालय ते घटनेतील तरतुदी प्रमाणे आहे काय(?) हे तपासून त्यावर निर्णय देते. 
 ⁃ मात्र प्रत्यक्षात एखाद्या विधेयकास विरोध असतांना, त्यावर सरन्यायाधीशांचे सोबत चर्चा केल्याचे भासवत व आभास निर्माण करत 
 ⁃ त्यावर कोणी आक्षेप घेऊ नये.. असा प्रकार हास्यास्पद व केविलवाणा आहे. 
 ⁃ अशा असंविधानीक व उथळ प्रयत्नांतून भाजपच्या भाषणजीवी नेतृत्वाचा अर्थात मोदी - शहांचा, सत्ता लोलुप चेहरा अधिक स्पष्ट व उघडा होत असल्याची टिका प्रदेश काँग्रेस'चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. 
 ⁃ स्वातंत्र्योत्तर भारतात प्रथमच एखाद्या 'विधेयक - कायद्यास सर्वोच्च न्यायव्यवस्थेची शिफारस वा कवच उभारण्याच्या असंवैधानिक प्रयत्न होता काय (?) असा संतप्त सवाल ही प्रदेश काँग्रेस ने केला. 
 ⁃ जेष्ठ विधीज्ञ व इंडीया आघाडीचे नेते कपिल सिब्बलजी यांनी सतर्कतेने केंद्र सरकारच्या या असंविधानीक प्रयत्नांवर आक्षेप नोंदवत हा प्रकार उघड केल्याबद्दल, जागरूक लोकशाहीचे पाईक असलेल्या कपिल सिब्बल यांना धन्यवाद दिल्याची पुस्ती ही गोपाळदादा तिवारी यांनी 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा