शेजारील राष्ट्रांच्या वर्तना मुळे सैन्य दलांचे काम अजून वाढले आहे: श्री काडसिद्धेश्वर महाराज

शेजारील राष्ट्रांच्या वर्तना मुळे सैन्य दलांचे काम अजून वाढले आहे: श्री काडसिद्धेश्वर महाराज 

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूर जवळील कणेरी मठ येथे शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सुरू झाले.

उद्घाटनासाठी कणेरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर महाराज हे उपस्थित होते. वंदे मातरम च्या गायनानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशन सुरू झाले. महाराजांनी सर्व माजी सैनिकांना आशीर्वचन देत आपले विचार मांडले. सैनिकी जीवनात जे काम सीमेवरती केले जाते त्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, सोबतच निवृत्तीनंतर ज्या सेवा सैनिक देतात त्या निस्वार्थी भावनेचाही त्यांनी यथोचित सन्मान आपल्या बोलण्यात केला. आंतरराष्ट्रीय व्यवहार, कूटनीती, भारताची भौगोलिक परिस्थिती, भारताचे शेजारी राष्ट्र व त्यांच्या विचारधारा या सर्वांचा विचार करता सैन्याचे काम दिवसेंदिवस आणखीन महत्त्वाचे होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अत्यंत क्लिष्ट असा विषय अत्यंत सहज सुलभ भाषेत माजी सैनिकांपर्यंत महाराजांनी पोहोचवला. भारतीय इतिहासातील विविध उदाहरणे व दाखले देत महाराजांनी सैन्याचे महत्त्व कसे अबाधित आहे हे पटवून दिले. इतिहासातील भारताच्या उज्वल अशा वाटचालीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला; भारतीय संस्कृती इंडोनेशिया पासून अफगाणिस्तान पर्यंत, आणि श्रीलंकेपासून तिबेट पर्यंत कशी होती याचे त्यांनी सार्थ वर्णन केले. 

अधिवेशनाला अ.भा.पू.सै.से.प. चे राष्ट्रीय अध्यक्ष ले. जनरल चतुर्वेदी तसेच महाराष्ट्र-गोवा अध्यक्ष एअरमार्शल प्रदीप बापट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री प्रदीप जोशी, ले. जनरल निंभोरकर आणि इन्फंट्री स्कूल बेळगाव चे ब्रिगेडियर मराठे , व्हाइस एअर मार्शल नितीन वैद्य संयोजक कर्नल विलास सुळकुडे, अण्णा कुंभार, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार योद्धा सैनिक व मात्तृशक्ती शिवाय या अधिवेशनाला भारतातील विविध राज्यातून सुमारे ४०० माजी सैनिक प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाचा समारोप ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे सैनिक कल्याण मंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाने होईल.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा