मिसिंग लिंक वरील दरड कोसळणे आणि रस्त्याचा दर्जा यासाठी जबाबदार कोण ?MSRDC संचालक अनिल गायकवाड यांची हकालपट्टी करा.
मिसिंग लिंक वरील दरड कोसळणे आणि रस्त्याचा दर्जा यासाठी जबाबदार कोण ?
MSRDC संचालक अनिल गायकवाड यांची हकालपट्टी करा.
आज पहाटे मिसिंग लीगच्या बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून 100 टन मलबा रस्त्यावर आला. ही अत्यंत गंभीर घटना असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु यामधून या मिसिंगलिंगचा दर्जा अयोग्य असल्याचे उघड झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट अविष्कार असं ज्याचं कौतुक देवेंद्र फडणवीस करत होते तो प्रत्यक्षात धोकादायक आणि दर्जाहीन कामाचं रूप असल्याचे दिसते आहे. असा एखादा दगड एखाद्या वेगाने जाणाऱ्या वाहनावर आदळला तर तर मोठा जीवघेणा अपघात होऊ शकतो.
या बोगद्याजवळील रिटेनिंग वॉल पडली असल्यामुळे या डोंगराची स्लोप स्टॅबिलिटी टेस्ट झाली आहे का? सुरक्षा भिंत (retaining wall)मजबूत का नव्हती? डोंगर भागाला तडे गेले आहेत का? Angle of repose (घसरणीचा कोन) ची की काळजी घेत मजबुतीकरण का केले गेले नाही? असे अनेक प्रश्न असून तातडीने या संदर्भात तांत्रिक विश्लेषण समोर आणणे गरजेचे आहे. या सर्व बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे का हाही प्रश्न आहे. या नवीन रस्त्यावरही दोनच दिवसांपूर्वी खड्डे पडल्याचे लक्षात आले होते. त्यासंदर्भातले देवेंद्र फडणवीस यांचे विधानही अशास्त्रीय होते. इंडियन रोड काँग्रेसच्या गाईडलाईन्स प्रमाणे हे रस्ते झाले नाही अथवा त्याचा दर्जा राखला गेलेला नाही हे उघड आहे. पहिल्या पावसाळ्यानंतर पुन्हा रस्त्यावर थर दिला जातो हे विधान सुद्धा चुकीचे होते.
या घटनेची जबाबदारी न घेता फडणवीस यांनी विरोधकांवर राजकीय टिप्पणी आणि निसर्गावर दोष ढकलू नये. या सगळ्याची जबाबदारी एम एस आर टी सी चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची असल्यामुळे त्यांना जबाबदार धरून त्यांची तात्काळ बडतर्फी केली जावी व या सुरक्षा, दर्जा संदर्भातल सर्व तांत्रिक बाबी पुन्हा तपासल्या जाव्यात अशी मागणी आम आदमी पार्टी करीत आहे.
मुकुंद किर्दत, प्रवक्ते आम आदमी पार्टी महाराष्ट्र
Comments
Post a Comment