मुंबई फाल्कन्स रेसिंग कडून पुण्यातील शाळांमध्ये F1® सिम रेसिंग टाईम ट्रायल्स सुरू
मुंबई फाल्कन्स रेसिंग कडून पुण्यातील शाळांमध्ये F1® सिम रेसिंग टाईम ट्रायल्स सुरू
पुणे, १ जुलै २०२६: मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने (एम.एफ.आर.एल) फॉर्म्युला १® च्या सहयोगाने त्यांच्या फ्लॅगशिप पार्टनर स्कूल प्रोग्रामची देशभरात सुरुवात केली आहे, ज्याद्वारे व्यावसायिक फॉर्म्युला १® सिम्युलेटर, संरचित ड्रायव्हर शिक्षण आणि तळागाळातील टॅलेंटचा शोध भारतातील शाळांमध्ये आणला जात आहे.
या उपक्रमाची पहिली अंमलबजावणी करत पुण्यातील द बिशप्स स्कूलने २६ ते २९ जून दरम्यान शहरात पहिल्या ऑफिशियल F1® सिम रेसिंग इंडिया ओपन स्कूल टाईम ट्रायल्सचे आयोजन केले होते. हा उपक्रम प्रत्यक्ष सुरू करणारी ही देशातील पहिली शाळा ठरली आहे.
हा उपक्रम व्यावसायिक फॉर्म्युला १® सिम्युलेटर्सच्या माध्यमातून स्पर्धात्मक सिम रेसिंगसह संरचित प्रशिक्षणाचा मेळ घालतो. याद्वारे विद्यार्थ्यांना मोटरस्पोर्टच्या तांत्रिक आणि धोरणात्मक पायाविषयी शिक्षित केले जाते, तसेच रेस इंजिनिअरिंग, वेईकल डायनॅमिक्स, डेटा अॅनालिटिक्स आणि सिम्युलेशन इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख करून दिली जाते. पुणे हे प्रदीर्घ काळापासून भारताचे ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग पॉवरहाऊस (शक्तीकेंद्र) म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे विविध विषयांमधील भविष्यातील मोटरस्पोर्ट टॅलेंटला जोपासण्यासाठी ही एक आपसूक निवड ठरली आहे.
या टाईम ट्रायल्समध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, ज्यामध्ये तीन फेऱ्यांमध्ये ५२८ ज्युनियर आणि ३५३ सिनियर अशा एकूण ८८१ विद्यार्थ्यांना आकर्षित केले. ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली, ज्यामध्ये टॉप १०० लीडरबोर्डमध्ये ५२ ज्युनियर आणि ४८ सिनियर ड्रायव्हर्सचा समावेश होता. सिनियर श्रेणीमध्ये, रयान बक्षी याने १:२१.८११ वेळेसह सर्वात वेगवान लॅप नोंदवला, तर अरमान खिंवसरा याने ज्युनियर श्रेणीत प्रभावी १:२३.३४७ वेळेसह अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचा उच्च दर्जा दर्शवत, ४० ज्युनियर स्पर्धकांनी १:३०.००० या प्रमाणपत्र निकषापेक्षा कमी लॅप टाईम नोंदवला. अव्वल स्थानावरील फरक अत्यंत कमी होता; टॉप ३ सिनियर ड्रायव्हर्समध्ये अवघ्या ०.०५६ सेकंदांचा, तर टॉप ३ ज्युनियर ड्रायव्हर्समध्ये केवळ ०.०९८ सेकंदांचा फरक होता. आघाडीची कामगिरी करणारे स्पर्धक आता झोनल स्तरापासून सुरू होणाऱ्या ऑफिशियल F1® सिम रेसिंग इंडिया ओपन टॅलेंट पाथवेमध्ये पुढे जाऊ शकतात. हा उपक्रम देशभरातील शाळांमध्ये विस्तारत असताना, एकंदरीत निकाल विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यास देखील मदत करतील.
या उपक्रमाविषयी मत व्यक्त करत मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित गाढोके म्हणाले, "मुंबई फाल्कन्समध्ये आम्ही तळागाळातील कार्टिंगपासून ते आंतरराष्ट्रीय सिंगल-सीटर रेसिंगपर्यंतचे मार्ग तयार करून भारतात एक शाश्वत मोटरस्पोर्ट परिसंस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच या खेळाचा आधार असलेले टॅलेंट, कौशल्ये आणि नवनिर्मितीला जोपासत आहोत. मोटरस्पोर्ट म्हणजे केवळ रेसिंग ड्रायव्हर्सपुरते मर्यादित नाही. हे इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, अॅनालिटिक्स आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये संधी निर्माण करते. या उपक्रमाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांनी या परिसंस्थेची व्यापकता सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखावी अशी आमची इच्छा आहे आणि याची सुरुवात करण्यासाठी ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंगचा समृद्ध वारसा असलेल्या पुणे एक उत्तम जागा आहे."
द बिशप्स स्कूलचा विद्यार्थी आणि महत्त्वाकांक्षी रेसिंग ड्रायव्हर सिद्धार्थ भानुशाली म्हणाला, "सामान्यतः, भारतातील शाळा मोटरस्पोर्टवर फारसे लक्ष केंद्रित करत नाहीत. माझ्या शाळेला मोटरस्पोर्टला इतर कोणत्याही खेळासारखीच वागणूक देताना पाहणे खरोखरच रोमांचक आहे. या सेटअपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते नियमित स्टिअरिंग व्हील वापरत नाहीत. ते प्रत्यक्ष फॉर्म्युला १® च्या स्टाईलचे स्टिअरिंग व्हील वापरत आहेत, ज्यामुळे हा अनुभव अधिक अस्सल वाटतो आणि तुम्हाला पूर्णपणे वेगळी अनुभूती मिळते."
ऑफिशियल F1® सिम रेसिंग इंडिया ओपन प्रोग्राम अंतर्गत भारतातील पहिली फ्लॅगशिप पार्टनर स्कूल म्हणून द बिशप्स स्कूल विद्यार्थ्यांना सिम्युलेटर प्रशिक्षण, संरचित स्पर्धा आणि भविष्यातील टॅलेंट शोधण्याच्या संधी उपलब्ध करून देणे सुरू ठेवेल, ज्यामुळे भारतातील मोटरस्पोर्टसाठी एक शाश्वत ग्रासरूट पाईपलाईन तयार होईल. हा वेग कायम ठेवत हा उपक्रम यानंतर पुण्यातील विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूल (आयबी) येथे जाईल, जिथे १ ते ५ जुलै २०२६ दरम्यान टाईम ट्रायल्सची पुढील फेरी आयोजित केली जाईल. यामुळे या
Comments
Post a Comment