प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणं आखावीततेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतडब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १६ वां राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न
प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणं
आखावीत
तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मत
डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १६ वां राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न
पुणे, ११ जुलैः " नागरी सेवेत प्रवेश करण्याचा आपल्या हेतूचा कधीही विसर पडू देऊ नका. यामध्ये प्रचंड आव्हाने असल्याने येथे राहूनच त्याचा सामना करावा. समाजाच्या व देशाच्या प्रगतीसासाठी योग्य ध्येय धोरणे आखून त्यावर अंमलबजावणी करावी. सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज व देश विकासासाठी असावी. प्रशासकीय सेवेत कार्य करतांना कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा. मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे.” असे मत तेलंगणा राज्याचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस (लॉ अॅण्ड ऑर्डर) महेश भागवत यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) यांच्या वतिने कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी स्पर्धा परीक्षा-२०२५’ मधील यशस्वितांच्या १६ व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष व माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. जयप्रकाश नारायण हे ऑनलाइन उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या डीन डॉ. अंजली साने, स्कूल ऑफ लॉ चे डीन डॉ. संतोष आगाव आणि सहयोगी संचालक प्रा.मंगेश लटपटे उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात यूपीएससी रैंकर्स होल्डरचा शाल, वर्ल्ड पीस डोमची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
महेश भागवत म्हणाले," सेवा कर्तव्य परमोधर्म ही ब्रीद वाक्य लक्षात ठेऊन याला सर्वाधिक महत्व दयावे. आपली एक चूक ही संपूर्ण समाजाला भोगावी लागेल. त्यामुळेच अचूक निर्णय घेऊन त्याचा त्रास कोणालाही होणार नाही हे पाहावे. राष्ट्रीय सुरक्षा हाच मुख्य अजेंडा ठेऊन प्रशासकीय सेवेत कार्य करावे. सहानुभूती, करुणा आणि पॅशन या तीन गोष्टी प्रशासकीय सेवेत कार्य करतांना अत्यंत महत्वाचे आहे. जीवनात सतत शिकण्याची सवय आणि उत्तम कार्य करण्यावर अधिक भर द्यावा.”
आनंदराव पाटील म्हणाले," प्रशासकीय सेवा हा अत्यंत महत्वाचा टास्क असून येथे टीमवर्क गरजेचे आहे. येथे भ्रष्टाचारापासून सतत दूर रहावे. कठोर परिश्रमाबरोबरच सतत शिकण्याची प्रवृत्ती ठेवावी. प्रगती करण्यासाठी नवनवीन गोष्टीं बरोबर कौशल्यावर अधिक भर दयावा. या सेेवमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेऊन नम्रतेचा गुण अंगिकारावा.”
डॉ. जयप्रकाश नारायण यांनी ऑनलाइन संदेश देतांना सांगितले की, देश प्रगतीपथावर आहे. परंतू आज ही देशाची खंत आहे की येथे ८५ ते ९० टक्के क्षेत्र असंघटीत क्षेत्रात कार्यरत आहे. शहरीकरणाचे प्रमाण वाढतांना दिसत आहेत. तसेच ४६ टक्के नागरिक कृषी क्षेत्राशी जुळलेले असल्याने यांच्या हित्याच्या गोष्टी कराव्यात. वर्तमान काळात शैक्षणिक कौशल्य, ऊर्जा क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात प्रचंड वाव आहे. त्यावर अधिक भर देण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.
यावेळी रँकर होल्डर्स राघव झुणझुणवाला, बसवराज केंम्पवाड, मोहिनी जगताप, साई आणि प्राची हनी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना कठोर परिश्रम, सकारात्म विचार, सर्व परिस्थितींशी दोन हात करत अभ्यासावर फोकस करण्यास जोर दिला.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना व सर्व सत्कारमूर्तींना आपल्या कार्याप्रती प्रामाणिकता राखण्याची शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.मंगेश लटपटे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment