टाटा सिएरा आता ईव्ही रुपात दाखल
टाटा सिएरा आता ईव्ही रुपात दाखल
मुंबई, १ जुलै, २०२६: टाटा डाँट ईव्ही या अग्रगण्य कंपनीने आज ऑल-न्यू सिएरा डाँट ईव्ही लाँच केली आहे. जुन्या लोकप्रिय कारला नव्या बोल्ड आणि इलेक्ट्रिक रूपात सादर करत कंपनीने इतिहास पुन्हा नव्याने लिहिला आहे. ही नवीन सिएरा डाँट ईव्ही तिच्या जुन्या आणि प्रसिद्ध डिझाईनला नेक्स्ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञानाशी जोडते, ज्यामध्ये ग्राहकांना उत्तम डिजिटल अनुभव आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह दमदार एसयूव्हीचा अनुभव मिळेल.
वेगळे डिझाईन, थरारक परफॉर्मन्स आणि रोजच्या वापरासाठी सोयीस्कर कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार खास तयार करण्यात आली आहे. यात एैसपैस जागा, स्मार्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट क्षमता मिळते. Sierra.ev च्या माध्यमातून TATA.ev ने आधुनिक एसयूव्हीसाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे. ही एसयूव्ही गतीशील, क्षमतापूर्ण आणि अद्वितीयरित्या आयकॉनिक आहे. या कारचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. १५ जुलै २०२६ पासून डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. Sierra.ev ची सुरुवातीची किंमत १८.७९ लाख रूपये आहे.
Sierra.ev चे लाँच भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठेसाठी एका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक वळणावर होत आहे, जिथे इलेक्ट्रिक वेईकल्स आता मुख्य प्रवाहाचा भाग बनत आहेत. ग्राहकांचा वाढता विश्वास, मालकीचा एकूण कमी होणारा खर्च, चार्जिंग पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विस्तार आणि परिपक्व होत चाललेली परिसंस्था यांमुळे ईव्हीच्या वापरात रचनात्मक बदल होत आहे. आता ईव्ही केवळ सुरुवातीच्या काही ग्राहकांपुरती मर्यादित न राहता दैनंदिन प्रवासाचा एक उत्कृष्ट आणि अपरिहार्य पर्याय बनत चालली आहे.
भारतातील सर्वात आकर्षक एसयूव्ही Sierra.ev लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “सियारा नेहमी गतीशीलतेसंदर्भात अग्रस्थानी राहिली आहे. ही वेईकल नाविन्यता, महत्त्वाकांक्षा व प्रगतीची प्रतीक राहिली आहे, तसेच भविष्यातील तंत्रज्ञान ग्राहकांच्या जवळ आणले आहे. पुन्हा सादर करण्यात आलेल्या या वेईकलने भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची निर्मिती करून एक नवा इतिहास रचला. आज, Sierra.ev च्या माध्यमातून आम्ही तोच वारसा पुढे नेत आहोत आणि इलेक्ट्रिक युगात एक प्रीमियम एसयूव्ही कशी असावी, याचा नवीन मापदंड प्रस्थापित करत आहोत. उत्कृष्ट रिअल-वर्ल्ड रेंज, उत्तम परफॉर्मन्स, इंटेलिजंट टेक्नॉलॉजी, अद्वितीय आरामदायीपणा आणि कुठेही जाण्याची क्षमता यांचा मेळ घालत Sierra.ev उत्तम अनुभव देते, जो जितका आकर्षक आहे, तितकाच परिवर्तनीय आहे.
मिड-एसयूव्ही सेगमेंट भारतातील एसयूव्ही बाजारपेठेचा गाभा आहे, जो नव्या पिढीच्या ग्राहकांमुळे आकाराला आला आहे. हे ग्राहक आपल्या वेईकलकडे त्यांची जीवनशैली, महत्त्वाकांक्षा आणि ओळखीचे प्रतिबिंब म्हणून पाहतात. ईव्ही आता मुख्य प्रवाहात वेगाने सामील होत असताना त्यांची आकर्षकता हाच त्यांच्या वापराला गती देणारा मुख्य घटक ठरेल. Sierra.ev या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही वेईकल आमची आतापर्यंतची सर्वात प्रगत एसयूव्ही असण्यासोबत भविष्याची आकर्षक अभिव्यक्ती आहे, जी इलेक्ट्रिक गतीशीलतेला पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक, सुलभ व प्रभावी बनवते, तसेच भारताच्या स्वच्छ, शून्य-उत्सर्जन भविष्याकडील प्रवास अधिक वेगवान करते.”
परसोनानुसार सुरूवातीच्या एक्स-शोरूम किंमती*
Sierra.ev बाबत अधिक माहिती
Sierra.ev सह ग्राहकांना आता इलेक्ट्रिक वेईकलची निवड करणे किंवा प्रीमियम एसयूव्हीकडून असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे, यांपैकी एकाच गोष्टीची निवड करण्याची गरज उरलेली नाही. ही वेईकल अधिक उत्कृष्ट क्षमता, परफॉर्मन्स आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदान करते, ज्यामुळे इलेक्ट्रिक एसयूव्ही कशी असावी याचा नवीन मापदंड प्रस्थापित होतो.
लक्झरी लाइफस्पेस विथ इंडल्जंट टेक्नॉलॉजीसह ही वेईकल एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि उत्कृष्ट कारागिरीच्या जोडीला प्रगत कनेक्टेड आणि डिजिटल अनुभव अखंडपणे प्रदान करून मालकीचा आनंद वेगळ्या पातळीवर नेते. रिअल-लाइफ रिअल-वर्ल्ड ईव्ही सुप्रीमसीच्या माध्यमातून, ही वेईकल आत्मविश्वास वाढवणारी रेंज, अल्ट्रा-फास्ट चार्जिंग आणि दैनंदिन उपयुक्तता देते, ज्यामुळे लांब पल्ल्याचा इलेक्ट्रिक प्रवास अगदी सुलभ होतो. या वेईकलमधील गो एनीव्हेअर, डू एनीथिंग (जीएडीए) परफॉर्मन्स क्षमता तिच्या मूळ गुणधर्मांना अधिक दृढ करते, जी दमदार परफॉर्मन्स, ऑल-व्हील-ड्राइव्ह क्षमता, इंटेलिजंट टेरेन मॅनेजमेंट आणि वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये उत्कृष्ट नियंत्रण व आत्मविश्वास देते.
एकत्रितपणे, या सर्व क्षमता Sierra.ev ला उत्तम वेईकल बनवतात, जिची कुटुंबाला खरोखर गरज आहे.
लक्झरी लाइफस्पेस विथ इंडल्जंट टेक्नॉलॉजी
Sierra.ev पारंपारिक एसयूव्हीच्या केबिनला खऱ्याखुऱ्या लाइफस्पेसमध्ये रूपांतरित करते, जिथे ऐतिहासिक रचना आणि आधुनिक, सुलभ तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ पाहायला मिळतो. ज्यामुळे प्रत्येक प्रवासाला अनुरूप असे वातावरण तयार होते. या वेईकलमध्ये विभागातील एैसपैस जागा आणि लाउंजसारखा मोकळेपणा, सखोल डिजिटल व संवेदनात्मक अनुभव मिळतो. सिनेमॅटिक इन्फोटेनमेंट आणि कॉन्सर्ट-ग्रेड ऑडिओपासून ते इंटेलिजंट कंट्रोल्स आणि पर्सनलायझेशनपर्यंत यातील प्रत्येक घटक आराम, आनंद आणि सुविधेला एका वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. परिणामी, ही जागा निव्वळ उपयुक्ततेच्या पलीकडे जाते, जी ग्राहकांच्या गरजा ओळखून प्रत्येक प्रवासाला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि रस्त्यावरील प्रवासाचा अनुभव पुन्हा नव्याने परिभाषित करण्यासाठी तयार केली गेली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
1. थिएटर प्रोसह होरिझोन व्ह्यू ट्रिपल-स्क्रिन + Arcade.ev परिसंस्था
2. डॉल्बी अॅटमॉस + १२-स्पीकर जेबीएल ब्लॅक सिस्टम + सोनिकशाफ्ट साऊंडबार
3. एअरकंसोल (स्मार्टफोन्सचा वापर करत कारमध्ये गेमिंगचा आनंद) - भारतात पहिल्यांदाच
4. हायपएआर एचयूडी (१९ वर्धित व्हिज्युअल्स, विविध मोड्स)
5. अल्ट्रा ग्लाइड सस्पेंशनसह फ्रिक्वेन्सी डिपेण्डंट डॅम्पिंग
6. पॅनोरामॅक्स सनरूफ - सेगमेंटमधील सर्वात मोठे ग्लासहाऊस फिल
7. ६२२ लिटर बूट स्पेस* - सेगमेंटमधील सर्वोत्तम + पॉवर्ड गेस्चर टेलगेट
8. पॉवर्ड सीट्स + थाय सपोर्ट एक्स्टेंडर
9. डिजि अॅक्सेस + ई-वालेट (ऑटो पार्क असिस्ट, समन, रिमोट पार्क)
रिअल-लाइफ रिअल-वर्ल्ड ईव्ही सुप्रीमसी
Sierra.ev जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे, म्हणजेच दैनंदिन वापरामध्ये ईव्हीचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. केवळ प्रयोगशाळेतील दाव्यांच्या पलीकडे जाऊन या वेईकलमध्ये उत्कृष्ट रिअल-वर्ल्ड रेंज, अल्ट्रा-फास्ट चार्जिंग, इंटेलिजंट सॉफ्टवेअर आणि कनेक्टेड अनुभवांचे संयोजन आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक प्रवास अत्यंत सुलभ होतो. विनासायास मार्ग नियोजन आणि इन-बिल्ट पेमेंट पर्यायांपासून ते सातत्याने मिळणाऱ्या ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपग्रेड्सपर्यंत यातील प्रत्येक घटक ग्राहकांची चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. परिणामी, ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरते, जी आधुनिक जीवनशैलीत अगदी सहज सामावून जाते आणि ईव्ही मालकीचा अनुभव व्यावहारिक व सर्वोत्तम बनवते.
Comments
Post a Comment