'नूमवि प्रशालेत "कला वारी" चित्रकला स्पर्धा उत्साहात आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी

'नूमवि प्रशालेत "कला वारी" चित्रकला स्पर्धा उत्साहात
       आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचे विचार, संत परंपरा आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि प्रशालेत
" सेवा वारी "उपक्रमांतर्गत "कला वारी "शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
पुण्याच्या महापौर मा सौ . मंजुषा दीपक नागपुरे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्पर्धेत प्रशालेचे 650 विद्यार्थी सहभागी झाले होते .
         स्पर्धेचे नियोजन व परीक्षण चित्रकला विभाग प्रमुख श्री . दत्तात्रय वेताळ यांनी केले . पाचवी ते सातवीच्या गटात
 प्रथम - दिव्यांशू दिपक यादव (सातवी बी )
द्वितीय -प्राजक्ता विक्रम स्वामी ( सहावी बी)
तृतीय -आरोही खोपडे (पाचवी बी)
आठवी ते दहावीच्या गटात
 प्रथम -श्रीतेज उत्तरेश्वर नरखेडकर (नववी ए ) द्वितीय -वैभव नवनाथ अडागळे ( दहावी सी )
तृतीय क्रमांक -परिणीती गणेश गांडले (आठवी सी)  
या विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे .
       शाला समिती अध्यक्ष मा .श्री . पराग ठाकूर साहेब, मुख्याध्यापक मा. श्री प्रकाश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
या स्पर्धेसाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता काळे ,पर्यवेक्षक सौ . सुषमा तुरबतमठ , श्री . बा .दा . खरात , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले .

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.