आपत्कालीन यंत्रणा सक्षम करणेबाबत / जेटिंग मशीन, पंप व अन्य मशीनरी उपलब्ध करणेबाबत


प्रति,
मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय - आपत्कालीन यंत्रणा सक्षम करणेबाबत / जेटिंग मशीन, पंप व अन्य मशीनरी उपलब्ध करणेबाबत.
मा. महोदय,
दोन तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मी नगरसेविका असलेल्या प्रभाग क्रं २९ ( डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलोनी ) येथे अनेक सोसायटीत, वस्त्यांमध्ये व रस्त्यावर पाणी साचले आहे. काही सोसायटीत तर कमरे एवढे पाणी असून ह्या सर्व ठिकाणी यंत्रांच्या कमतरतेमुळे मदत करण्यात अडचणी येत आहेत.एकेका ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी काही तासांचा अवधी लागत असून दुसऱ्या ठिकाणी कामगार व यंत्र पोहोचेपर्यंत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तरी ह्या पत्राद्वारे मी आपणास विनंती करते की पावसाळ्याच्या काळात अधिकच्या जेटिंग मशीन, पंप व मनुष्य बळाची त्वरित व्यवस्था करावी व नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच ह्या सर्व ठिकाणी पुन्हा पाणी साचू नये यासाठी दीर्घाकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने तांत्रिक तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांची मदत घेऊन आराखडा तयार करावा व त्वरित त्याची अंमलबजावणी करावी.
यासह माझा प्रभाग हा हरित प्रभाग असल्यामुळे येथे झाड पडीच्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अग्निशमन दलाचे जवान तातडीने कार्यवाही करून रस्ते मोकळे करतात मात्र त्यानंतर खोड,फ़ांद्या व कचरा जागेवरून हलविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करावी अशीही मागणी करत आहे.
आपली,
सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, वारजे कर्वेनगर प्रभाग समिती.
नगरसेविका प्रभाग २९.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.