वाकड पोलिस ठाणे येथे डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे, पुणे येथील माजी संचालक डॉ.अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध ₹४.९८ कोटींच्या अपहार आणि गोपनीय माहिती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

वाकड पोलिस ठाणे येथे डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे, पुणे येथील माजी संचालक डॉ.अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध ₹४.९८ कोटींच्या अपहार आणि गोपनीय माहिती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड — ५ जुलै २०२६: डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे, पुणेचे माजी संचालक अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध संस्थेच्या सुमारे ₹४,९८,६६,००० इतक्या निधीचा कथित अपहार, संस्थेची गोपनीय माहिती (डेटा) चोरणे तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) प्राप्त झालेल्या तपास अर्जावर प्राथमिक चौकशी केल्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला. संस्थेच्या वतीने अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, संस्थेला प्राप्त झालेल्या अंतर्गत लेखापरीक्षण (Internal Audit) अहवालामध्ये अमोल गावंडे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गंभीर गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१६(४), ३१८(४), २४८, ३३६ आणि ३४०, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ४३, ६६ आणि ७२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करीत असून, आर्थिक गैरव्यवहाराचे संपूर्ण स्वरूप उघड करणे तसेच चोरीला गेलेला डेटा परत मिळविणे, या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार, तपासात सहभागी होण्यासाठी पोलिसांनी अमोल गावंडे यांना अनेक वेळा समन्स बजावले आहेत. मात्र त्यांनी सातत्याने चौकशीस व तपासास प्रतिसाद दिलेला नाही आणि ते तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सध्या ते भारताबाहेर गेले असून, ते दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.