महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ‘माधवराव पटवर्धन सभागृह' नवीन शुल्कासह उपलब्ध

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ‘माधवराव पटवर्धन सभागृह' नवीन शुल्कासह उपलब्ध

पिंपरी, पुणे (दि. ०१ जुलै २०२६) मराठी रंगभूमी नव्याने नावारूपाला येत आहे. प्रेक्षक वर्गामध्ये वाढ होताना दिसून येते. या अनुषंगाने मराठी प्रेक्षकांच्या प्रेमाखातर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने माधवराव पटवर्धन सभागृह टिळक रोड पुणे येथे चालू झाले आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
   या सभागृहाची आसन क्षमता १२० असून ते वातानुकुलित आणि अद्ययावत तांत्रिक सोयींनी युक्त असे करण्यात आले आहे. हे सभागृह पुस्तक प्रकाशन, अभिवाचन, परिसंवाद, मुलाखती, काव्यवाचन, एकपात्री प्रयोग, पॉडकास्ट, व्याख्याने, कथाकथन, चर्चा सत्र, छोट्या परिषद, विविध संस्थांच्या वार्षिक सभा, शैक्षणिक विशेष व्याख्याने, सेमिनार्स, ऑडिशन्स आदी कार्यक्रमा साठी सशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे.
   या सभागृह साठी बुधवार, (दि. १ जुलै) पासून नवीन शुल्क रचना करण्यात आली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी तीन तासांसाठी ५ हजार रुपये, तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टयांचे दिवस सोडून इतर दिवशी तीन तासांसाठी ४ हजार रुपये आकारले जातील. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते १२ किंवा १२ ते ३ या वेळात सभागृहाचे भाडे ३,५०० रुपये अशी विशेष सवलत देण्यात येणार आहे. तसेच सभागृहाचे आरक्षण करणारी व्यक्ती साहित्य परिषदेची आजीव सदस्य असल्यास शुल्कामध्ये १० टक्के सवलत मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी साहित्य परिषद कार्यालय दूरध्वनी क्रमांक ९४०४७७२६६१ वर संपर्क साधावा असेही आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.