मोशी कचरा डेपो दुर्घटना चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा - माजी खा. अमर साबळे

मोशी कचरा डेपो दुर्घटना चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा - माजी खा. अमर साबळे 


पिंपरी, पुणे (दि. ९ जुलै २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील कचरा डेपो येथे बुधवारी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. २४ तास उलटून गेले तरी येथील बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ चे जवान या कचऱ्याच्या डोंगराखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी
अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उपस्थित झालेले सुरक्षिततेचे बाबतचे विषय आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचे प्रश्न याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. याची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. तसेच या कचरा डेपो बाबत परिसरातील नागरिकांच्या असलेल्या सर्व तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नये कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी खासदार अमर साबळे यांनी केले.
गुरुवारी दुपारी माजी खासदार अमर साबळे यांनी माजी नगरसेवक माऊली थोरात, कामगार नेते हनुमंत लांडगे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.