स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जहाजातून उडी घेऊन फ्रान्स चा किनारा गाठला या स्मरणार्थ "श्री स्वामी समर्थ मंडळा"तर्फे मोतीबाग येथे सागरा प्राण तळमळला नाटय अभिवाचन
८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जहाजातून उडी घेऊन फ्रान्स चा किनारा गाठला या स्मरणार्थ "श्री स्वामी समर्थ मंडळा"तर्फे मोतीबाग येथे सागरा प्राण तळमळला नाटय अभिवाचन
पुणे ( प्रतिनिधी)
दिनांक ८ जुलै १९१० स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जहाजातून उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला त्याचे स्मरण म्हणून ८ जुलै २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंडळाने मधुसूदन कालेलकर लिखित "सागरा प्राण तळमळला" नाटकाचे अभिवाचन कार्यक्रम भारतीय संस्कृती संवर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात शुभारंभाचा प्रयोग केला.अभिवाचन सुधीर मोघे,अनुपमा कुलकर्णी,प्रियांका अभ्यंकर ,प्रदीप बर्गे,प्रदीप रत्नपारखी,राजीव कुलकर्णी,लक्ष्मण दाते,संदीप नगरकर,निलेश दातार या कलाकारांनी सादर केले.याची संकल्पना डॉ शिरीष ठाकूर यांची होती तर सूत्र संचलन प्रियांका अभ्यंकर यांनी केले.दिग्दर्शन अनुपमा कुलकर्णी यांनी केले.संगीत संयोजन अनुपमा कुलकर्णी,प्रसाद घोटवडेकर,ध्वनी हरीश ढोकळे आणि चित्रीकरण सहाय्य हर्षद लिमये यांनी केले.यावेळी उपस्थित नाट्य कलावंतांचा भारतीय संस्कृती संवर्धक मंडळाचे विश्वस्त बाजीराव मणेरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भाऊराव क्षीरसागर यांच्या हस्ते भारतमातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे संजय गिरे,महेश गोडबोले या वेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment