मुसळधार पावसातही अंघोळीची गोळी संस्थेचे 'दोरे मुक्त वड' अभियान
*मुसळधार पावसातही अंघोळीची गोळी संस्थेचे 'दोरे मुक्त वड' अभियान*
वटपौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाला दोरे गुंडाळतात.
पुढे हे दोरे असेच वर्षानुवर्षे राहतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. झाडांवर अवलंबून असलेल्या मी जिवांनासुद्धा या दोऱ्यांचा त्रास होतो.
म्हणूनच 'अंघोळीची गोळी संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला टीमच्या वतीने "वटवृक्ष संवर्धन अभियान" राबविण्यात आले. हा पर्यावरणपूरक उपक्रम सदगुरु दत्त गार्डन, यमुनानगर, निगडी तसेच यमुनानगर परिसरातील वडाच्या झाडांवर उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत वटपौर्णिमेनिमित्त श्रद्धेने वडाच्या झाडांना बांधण्यात आलेले दोरे काळजीपूर्वक काढून झाडांना मुक्त करण्यात आले. त्यामुळे झाडांना मोकळा श्वास मिळण्यास मदत झाली.
असे करून संस्थेने हवामानठोसा दिला असे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.
मुसळधार पावसातही सर्व महिला कार्यकर्त्यांनी पावसाची तमा न बाळगता उत्साहाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या अभियानामागील उद्देश म्हणजे परंपरेचा सन्मान राखत पर्यावरणाचे संरक्षण करणे, वटवृक्षांचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक परंपरांविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे हा होता असे
अंघोळीची गोळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा रेखा रांगोळे म्हणाल्या.
यावेळी अंघोळीची गोळी संस्थेच्या कार्यकर्त्या सीमा नायक, भावना वाघचौरे, आयुता रांगोळे, रूपाली वाघचौरे, सुनंदा तोडकर, रेखा कर्डिले, कमल मगर, वंदना शिर्के, नंदा तापकीर आणि पुरोहित काकू यांनी मोलाचे योगदान दिले.
Comments
Post a Comment