भर पावसात टँकरने डीव्हायडर मधील झाडांना पाणी घालण्याच्या प्रकाराचा अधिकृत खुलासा करणेबाबत...
प्रती,
मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय - भर पावसात टँकरने डीव्हायडर मधील झाडांना पाणी घालण्याच्या प्रकाराचा अधिकृत खुलासा करणेबाबत...
मा. महोदय,
आज सर्वच सोशल मीडिया वर भर पावसात झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर च्या व्हिडीओ ने धुमाकूळ घातलाय आणि मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या टिंगल टवाळीचा पाऊस पडलाय..प्रचंड टीका होतं आहे. मी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरविले आणि प्रथम सापडला.... तो टँकर मालक आणि मग त्याचा टँकर भाड्याने घेणारे असे दोघांशीही बोलणे झाले.... त्यांनी केलेल्या खुलाश्याची मनपा प्रशासनाने त्वरित शहानिशा करावी....
✅ समर्थ टँकर सप्लायर्स.... मालक श्री. सचिन पवार यांचा टँकर भाड्याने घेतला ऊर्जा डेव्हलपर्स व सागर लुक आऊट ने... ह्या कंपनीने मेट्रो कडून जाहिरातीचे rights (अधिकार) मिळविले व त्या मोबदल्यात त्यांनी मेट्रो मार्गाखालील डीव्हायडर चे सुशोभिकरण करावयाचे असे ते टेंडर ( करार ) आहे.याबाबत टँकर मालकाने फक्त टँकर भाड्याने दिला असून सागर लूक आऊट चे विक्रम यादव व अजित पाटील यांनी दिलेल्या खुलाश्यानुसार...
मेट्रो खालील डीव्हायडर मधील सुशोभिकरण केलेल्या रोपांना पावसाचे पाणी मिळत नाही... कारण ते मेट्रो लाईन खाली संरक्षित राहते. गेले 8/10 दिवस त्या झाडांना पाणी घातले गेले नाही, ती झाडें जगविणे गरजेचे असल्यामुळे आज टँकर भाड्याने घेऊन पाणी घालण्यात आले. ( सदर पाणी बोर चे असल्याचा खुलासा सचिन पवार यांनी केला आहे व वारजे येथून त्यांनी टँकर भरल्याचे सांगितले )
तरी कृपया त्यांनी केलेल्या खुलाश्याची चौकशी करून सत्य परिस्थिती पुणेकरांसमोर मांडावी.
त्यांचे कथन खोटे असल्यास योग्य ती कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो - 9850999995
Comments
Post a Comment