कोटकने लाँच केले हौसला २.०, धैर्य आणि दृढनिश्चयाच्या जोरावर पाहिलेल्या स्वप्नांना देणार पाठबळ


कोटकने लाँच केले हौसला २.०, धैर्य आणि दृढनिश्चयाच्या जोरावर पाहिलेल्या स्वप्नांना देणार पाठबळ


मुंबई, ७ जुलै २०२६: कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ब्रँड प्लॅटफॉर्मचा दुसरा अध्याय हौसला २.० लाँच केला आहे. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या 'हौसला है तो हो जायेगा' या विचारसरणीवर हा पुढील टप्पा आधारित आहे.

कोटकने २०२५ मध्ये 'हौसला है तो हो जायेगा'ची सुरुवात केली होती, तेव्हा त्याची मूळ संकल्पना आधुनिक भारताच्या विशेष भावनेवर आधारित होती, ती म्हणजे, आजच्या काळातील महत्त्वाकांक्षा देशातील सर्वात प्रबळ शक्ती बनली आहे. विविध व्यवसाय, शहरे आणि पिढ्यांमधील आजचे भारतीय नागरिक पूर्वीच्या पिढ्यांनी कधी विचारही केला नसेल अशी मोठी स्वप्ने पाहत आहेत, उच्च ध्येये ठेवत आहेत आणि नव्या शक्यतांची कल्पना करत आहेत.

"कोटक महत्त्वाकांक्षेला पाठबळ देते. कोटकच्या माध्यमातून आम्हाला धाडसी व्यावसायिक निवडींना आणि विकासाच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ द्यायचे आहे, ज्या आव्हानात्मक असल्या तरीही काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्याची क्षमता ठेवतात," असे कोटक महिंद्रा बँकेचे प्रेसिडेंट, हेड - बिझनेस बँकिंग आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर रोहित भासिन म्हणाले. "आज भारतीतातील व्‍यक्तींची त्यांच्या सर्वात मोठ्या संकल्पनेला प्रत्‍यक्षात आणण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. पण अनेकदा कृती करण्यापूर्वी मनात येणारी धाकधूक किंवा संकोच यामध्ये अडथळा ठरतो. व्‍यक्तींना हा संकोचाचा पूल ओलांडून त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पाऊल उचलायला आम्हाला मदत करायची आहे. तुमचे धाडसी स्वप्न असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत."

"आज भारतात व्‍यक्तींच्‍या महत्त्वाकांक्षा भरपूर आहेत. पण दृढनिश्चय या महत्त्वाकांक्षेचे कृतीत रूपांतर करतो," असे कार्टव्हील क्रिएटिव्ह कन्सल्टन्सीचे सीईओ रामकृष्ण देसिराजू म्हणाले. "व्‍यक्तींना अनेकदा कोणत्या मार्गाने जायचे आहे हे माहित असते, पण निवडीच्या क्षणी संकोच करतात. हौसला २.० याच मानवी सत्यावर आणि जेव्हा एखादी व्यक्ती संकोच बाजूला ठेवून कृतीची निवड करते, तेव्हाच खऱ्या प्रगतीची सुरुवात होते या विश्वासावर आधारित आहे."

विशेषतः कोटकचा विश्वास आहे की, सध्या आयात केल्या जाणाऱ्या किंवा फक्त असेंबल (एकत्रित) केल्या जाणाऱ्या वस्तूंचे भारतात उत्पादन करणे असो, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासात योगदान देणे असो, किंवा बदलत्या जागतिक आर्थिक व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा फायदा घेणे असो, भारतातील व्‍यक्ती आज मोठ्या प्रमाणावर नवनिर्मिती आणि उद्योग उभारणीकडे वळत आहेत.

हौसला २.० च्या ब्रँड जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Click here).


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.