सहकार आणि लोकशाही ही एकमेकांना पूरक तत्वे- आमदार रोहित पवार


सहकार आणि लोकशाही ही एकमेकांना पूरक तत्वे
- आमदार रोहित पवार
पुणे :- सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगिण विकास होऊ शकतो, या लोकशाहीच्या पायाभूत तत्वावरच सहकार चळवळ उभी असून सहकार आणि लोकशाही ही एकमेकांना पूरक असलेली तत्वे आहेत, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
भारत सरकारतर्फे दिनांक ६ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा म्हणजे २०२६ मध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिनांक २९ जून २०२६ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 
यानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.तर्फे बीएमसीसी अर्थात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात युवा सहकार संस्थेचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 
बीएमसीसीमध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.चे अध्यक्ष सुहास पटवर्धन, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पौडेल, युवा सहाकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक भीम बलकवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.चे उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, सचिव मनीषा कोष्टी, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.चे तज्ज्ञ संचालक अॅड. प्रसाद परब, कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी, अरूण निम्हण,महा प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे आणि सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सहकाराच्या वृध्दीसाठी तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येईल आणि तरूणांच्या नवकल्पांचे स्वागत आणि समावेश कसा करता येईल, याचा धांडोळा घेतला पाहिजे. शेअरिंग इकोनॉमी ही संज्ञा अलीकडेच अस्तित्वात आली आहे. मात्र, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शंभर वर्षांपूर्वी हे तत्व अस्तित्वात आले होते. शहरी आणि ग्रामीण भागावर थेट परिणाम घडवून आणणारी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या. ही एकमेव संस्था असून तिची व्याप्ती बरीच मोठी आहे. 
यावेळी युवा सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक भीम बलकवडे, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पौडेल, अॅड. प्रसाद परब आणि सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.चे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी केले. कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

छायाचित्र ओळीः- केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.तर्फे बीएमसीसी अर्थात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात आज युवा सहकार संस्थेचा शुभारंभ डिजीटल पध्दतीने करताना आमदार रोहित पवार. यावेळी सुहास पटवर्धन, प्राचार्य दिलीप पौडेल, भीम बलकवडे, सुभाष कर्णिक, मनीषा कोष्टी, अॅड. प्रसाद परब, चारुहास कुलकर्णी, अरूण निम्हण, महा प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे आणि सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

छायाचित्र ओळीः- केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्या.तर्फे बीएमसीसी अर्थात बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात आज युवा सहकार संस्थेचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार. यावेळी सुहास पटवर्धन, प्राचार्य दिलीप पौडेल, भीम बलकवडे, सुभाष कर्णिक, मनीषा कोष्टी, अॅड. प्रसाद परब, चारुहास कुलकर्णी, अरूण निम्हण, महा प्रदेश युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे आणि सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.