लेझर पॉवर अँड इन्फ्रा लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी होणार खुली
लेझर पॉवर अँड इन्फ्रा लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी होणार खुली
लेझर पॉवर अँड इन्फ्रा लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी 203 रु. ते प्रत्येकी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी 214 रु. (“इक्विटी शेअर्स”) किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – बुधवार, 8 जुलै 2026
बोली / ऑफर सुरू होण्याचा दिनांक – गुरुवार, 9 जुलै 2026 आणि बोली / ऑफर बंद होण्याचा दिनांक – सोमवार, 13 जुलै 2026
बोली किमान 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी समभागांच्या पटीत लावता येईल.
3 जुलै 2026 रोजीची रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) ची लिंक –
https://laserpowerinfra.com/wp-content/uploads/2026/07/Red-Herring-Prospectus.pdf
6 जुलै 2026: लेझर पॉवर अँड इन्फ्रा लिमिटेड (“कंपनी”) आपल्या प्रत्येकी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्रीची (“ऑफर”) गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठीची बोली ही बोली /ऑफर सुरू होण्याच्या एक कार्यदिवस आधी म्हणजे बुधवार 8 जुलै 2026 असेल.
बोली /ऑफर बंद होण्याचा दिनांक सोमवार, 13 जुलै 2026* आहे.
प्रत्येकी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी 203 रु. ते प्रत्येकी 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी 214 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी समभागांच्या पटीत लावता येईल.
या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये 5,420.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून 2,000.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.
या ऑफर फॉर सेलमध्ये दीपक गोयल यांच्याकडून 1,125.00 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स, राखी गोयल यांच्याकडून 250.00 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि देवेश गोयल यांच्याकडून 625.00 दशलक्ष रु. पर्यंतचे इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”) समाविष्ट आहेत.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड या नावाने ओळखली जात होती) आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.
Comments
Post a Comment