शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम(पुणे क्लायमेट वॉरीयर्स) स्थळ-- इंडीयन ऋॉ सोसायटी फॉर आर्बिट्रेशन ॲंड मेडिएशन(ILSCA) पुणे
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम(पुणे क्लायमेट वॉरीयर्स) स्थळ-- इंडीयन ऋॉ सोसायटी फॉर आर्बिट्रेशन ॲंड मेडिएशन(ILSCA) पुणे
पुणे क्लायमेट वॉरीयर्स : हवामान- जागरूक आणि भविष्याभिमुख नागरीक घडविण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा . "जागतिक संकल्पांना स्थानिक कृतीची साथ मिळाली तरच खरी हवामानाची कृती घडते" या विचाराने आगामी वर्षाची दिशा निश्चित करत ॲड. दिव्या चव्हाण-जाचक यांनी उपस्थित शिक्षकांचे स्वागत केले.पुणे क्लायमेट वॉरीयर्स ही शाळांना हवामान- जागरुक जबाबदार आणि भविष्याभिमुख नागरीक घडविणारी सहयोगी चळवळ असल्याचे सांगितले यानंतर ॲड. वंदना चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन करत पुण्यातील ५० हून आधिक शाळांमधील सुमारे १०० शिक्षकांना आगामी वर्षभर शाळांमधून प्रभावी हवामान कृती घडवून आणण्यासाठी प्ररीत केले. त्यांनी १९७२ च्या स्टॉकहोम परिषदेतून आजपर्यंतच्या जागतिख हवामान चळवळीचा आढिवा घेत तळागाळातील लोकसहभागाचे महत्व अधोरेखीत केले वॉर्ड वॉच उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्थिनिक स्वराज्य संस्था,नागरी जबाबदाऱ्या आणि पर्यावरणीय प्रश्न सोडविण्यात सक्रीय सहभाग घेण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)२०२० विषयी बोलताना श्रीमती मालती कलमाडी यांनी शिक्षण हे पाठांतरापेक्षा अनुभवाधारीत ,आनंददायी आणि कोशल्याधारीत होत असल्याचे सांगितले.पुणे क्लायमेट वॉरीयर्स SDG आधारीत धडे आणि उपक्रम हे सर्जानशीलता ,सहकार्य ,चिकित्सक वचार आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाला चालना देत NEP च्या उद्दीष्टांना बळकटी देतात असे त्यांनी नमूद केले." पुणे क्लायमेट वॉरीयर्स ही स्पर्धा नसून सहकार्याची चळवळ आहे " असे सांगत त्यांनी पुरस्कारापेक्षा पर्यावरणाबद्दल संवेदनशील आणि जबाबदार विद्यार्थी घडविणे हेच खरे यश असल्याचे सांगितले.कार्यक्रमात हवामान बदलामुळे निर्माण होणारी मानसिक अस्वस्थता ( Climate Anexiety) आणि सशक्त समाजनिर्मिती यावरही भर देण्यात आला.पुणे महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख श्री. गणेश सोनुने यांनी आपत्तीपूर्व तयारी आणि प्रथमोपचाराचे महत्व स्पष्ट केले तर सेंटर फॉर मेंटल हेल्थ लॉ ॲंड पॉलिसी(CMHLP) च्या प्रतिनिधींनी मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्यावर मार्गदर्शन केले द इको फॅक्टरी फौंडेशनचे संस्थापक श्री आनंद चोरडीया यांनी शाश्वत विकास ,हरीत उद्योजकता आणि नाविन्य याची सांगड घालत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्पादने विकसित करण्याचे आवाहन केले त्यानी शाश्वत भारत सेतू या संवादात्मक प्रदर्शनाची माहीती देत शाळांना नेट झिरो सिटीज सेंटर फॉर एक्सलन्सला भेट देण्याचे निमंत्रण दिले.कार्यक्रमाती सांगता ५० हून आधिक शाळातील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हवामान शिक्षण प्रत्यक्ष कृतीतून पोहोचविण्याचा सामूहीक संकल्पाने झाली.अनुभवाधारीत शिक्षण ,जबाबदार नागरीकत्व आणि सामूहीक कृतीच्या माध्यमातून पुणे क्लायमेट वॉरीयर्स हरीत ,निरोगी आणि शाश्वत भविष्य घडविण्याची प्रभावी चळवळ म्हणून पुढे वाटचाल करत आहे.या कार्यक्रमात वृषाली दाभोळकर , राधिका नाईकवाडी ,पुणे क्लायमेट वॉरीयर्सच्या टीममधील सदस्य तसेच अनेक स्वयंमसेवक उपस्थित होते .त्यांच्या सामूहीक प्रयत्नांमुळे हा शिक्षक ओरीएंटल कार्याक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Comments
Post a Comment