योग, ध्यान आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आनंद मार्गचा मोफत योग परिसंवाद संपन्न



 *योग, ध्यान आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आनंद मार्गचा मोफत योग परिसंवाद संपन्न* 

पुणे : आनंद मार्ग प्रचारक संघ, पुणे यांच्या वतीने नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने मोफत योग परिसंवादाचे आयोजन चिंबळी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य प्रशिक्षक आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांच्या हस्ते सुरु करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या मोफत योग परिसंवादात आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत सह आचार्य योगेश्वरानंद अवधूत , आचार्य रागतीतानंद अवधूत, आचार्य निर्भयानंद अवधूत त्याचप्रमाणे श्री प्रफुल्ल भावेकर, भुक्ती प्रधान यांनी मार्गदर्शन केले. 
समाजात निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि सामूहिक कल्याणाविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत होत असल्याचे  आज पुणे पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांनी  सांगितले.

यावेळी बोलताना आचार्य सिद्धविद्यानंद अवधूत यांनी आनंद मार्ग ही १९५० मध्ये श्री श्री आनंदमूर्तीजी यांनी स्थापन केलेली जागतिक सामाजिक व आध्यात्मिक संस्था असून, योग, ध्यान, मानवसेवा आणि आध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. या परिसंवादात योग, ध्यान, शिस्तबद्ध जीवनशैली आणि आधुनिक जीवनातील ताणतणावावर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. 
शेकडो नागरिक, विद्यार्थी, योगसाधक आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, उपक्रमाचा लाभ घेतला . 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.