"बेबी डू डाय डू" मध्ये अँग्री यंग वुमन दिसणार हुमा कुरेशी**मराठी भूमिका पडद्यावर साकारण्यास उत्सुक - हुमा कुरेशी

*"बेबी डू डाय डू" मध्ये अँग्री यंग वुमन दिसणार हुमा कुरेशी*

*मराठी भूमिका पडद्यावर साकारण्यास उत्सुक - हुमा कुरेशी*
पुणे : चित्रपटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री एक कमकुवत पात्र दाखवले जाते. स्त्रीला वाचवण्यासाठी सुद्धा शेवटी एक पुरुष येतो आणि खलनायकापासून त्या स्त्रीची सुटका करतो. अशा पारंपारिक भूमिकेपेक्षा मला वेगळी भूमिका पडद्यावर साकारायची होती. "बेबी डू डाय डू" च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. आपल्याला अनेक वर्षांपासून पडद्यावर अँग्री यंग मॅन पाहण्याची सवय आहे, परंतु बेबी डू डाय डू चित्रपटांमध्ये प्रथमच तुम्ही अँग्री यंग वुमन पहाल असे प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी सांगितले.
सलीम सिबलिंग आणि पुणे 04 पिक्चर यांनी निर्मिती केलेला हुमा कुरेशी यांची प्रमुख भूमिका असलेला बेबी डू डाय डू हा हिंदी चित्रपट येत्या 3 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे या निमित्ताने पुण्यातील औंध येथील वेस्टएंड मॉल येथे हुमा कुरेशी, चित्रपटाचे दिग्दर्शक नचिकेत सामंत, अभिनेता रचित सिंग आणि मरुधर शेखावत यांनी भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी चित्रपट संदर्भात प्रेक्षकांशी गप्पा मारल्या.
हुमा कुरेशी म्हणाल्या, बेबी डू डाय डू हा चित्रपट आमच्यासाठी आव्हान आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी कोणताही मोठा स्टुडिओ अथवा निर्माता आमच्या पाठीशी नाही. आम्ही पूर्णतः प्रेक्षकांच्या पाठिंबावर आणि प्रेमावरच हा चित्रपट तयार केला आहे त्यामुळे आम्हाला प्रेक्षकांचा निश्चितच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.
बेबी डू डाय डू या चित्रपटांमध्ये मी प्रथमच मूकबधिर मुलीची भूमिका साकारली आहे. पडद्यावर एकही संवाद न म्हणता आपली भूमिका साकारणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. मी माझ्या परीने शंभर टक्के भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून ही निश्चितच भूमिका प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे, असेही हुमा कुरेशी यांनी यावेळी सांगितले.
दिग्दर्शक नचिकेत सामंत म्हणाले पुणे 04 पिक्चर एलएलपी या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही वेगळेपण टिकवणार आहोत त्यामुळेच आम्ही बेबी डू डाय डू हा वेगळ्या प्रकारचा चित्रपट तयार केला आहे या चित्रपटाला निश्चितच प्रेक्षकांचे प्रेम मिळेल.
हुमा कुरेशी यांच्यासह बेबी डू डायडू या चित्रपटांमध्ये चंकी पांडे सिकंदर खेर सीमा पहावा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता साकिब सलीम यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 
मराठी भूमिका करण्यासाठी उत्सुक
हायवे या मराठी चित्रपटांमध्ये मी यापूर्वी छोटी भूमिका साकारली होती. मराठी भूमिका पडद्यावर साकारण्याचा आणि अस्खलितपणे मराठी संवाद पडद्यावर म्हणण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे . हे माझ्यासाठी आव्हान असून मी एक अभिनेत्री म्हणून हे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला हुमा कुरेशी मराठी चित्रपटांमध्ये दिसेल असे देखील हुमा कुरेशी यांनी यावेळी सांगितले

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.