डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी - दीपक शिकारपूर.महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांसह नकाशा प्रकाशित करताना अत्यानंद - सौ. मंजुश्री खर्डेकर.
डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी - दीपक शिकारपूर.
महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांसह नकाशा प्रकाशित करताना अत्यानंद - सौ. मंजुश्री खर्डेकर.
डॉ. सुरेश गरसोळे यांचे भूगोल विषयातील कार्य अद्वितीय असून त्यांनी पुढील 1 मे 2027 पर्यंत नकाशांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी व परदेशा प्रमाणे बोलणारे नकाशे प्रकाशित करावेत असे मत प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. एरंडवण्यातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात महाराष्ट्राचा नवीन नकाशा प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ह्या नकाशाचे निर्माते ज्येष्ठ भूगोल तज्ञ् डॉ. सुरेश गरसोळे, वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, मुक्ता गरसोळे कुलकर्णी, एड.अमृत गरसोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी राज्याचा नवीन नकाशा प्रकाशित होत आहे आणि तो देखील आपल्या अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांनी याचा अत्यानंद होत आहे अश्या भावना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांमध्येचं नव्हे तर सर्वांनाच भूगोलाची गोडी लागावी यासाठी डॉ. गरसोळे अथक परिश्रम घेत असून त्यांच्या कार्याची शासन स्तरावर दखल घेतली जावी असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
अनेक दशक नवनवीन प्रकारचे नकाशे साकरण्याची संधी मिळाली मात्र आज नवीन जिल्ह्यासह राज्याचा नकाशा तयार करत असताना श्री राम मंदिर, राज्यातील विविध किल्ले असलेला नकाशा देखील साकारला असल्याचे डॉ. गरसोळे म्हणाले. विद्यार्थ्यांना नकाशा वाचणे सुलभ व्हावे यासाठी माझे सतत प्रयोग सुरू असतात असेही डॉ. गरसोळे म्हणाले.
यावेळी डॉ. मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांनी
"बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥"
हे महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. तसेच त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र भूगोल समिती ही समाजसेवेच्या भावनेने सातत्याने कार्य करते असे सांगितले.श्री. अनिल खाडिलकर यांनी शंखनाद केला तर ऍड.अमृत गरसोळे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी उपस्थितांना नवीन नकाशाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment