श्रवणदोषाकरिता जितकी गरज उपचारांची तितकीच जनजागृतीची*

  
*प्रख्यात गायिका कविता पौडवाल ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सह सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई व ओएनजीसी कंपनीतर्फे उपक्रम ; तब्बल ११० मूकबधिर मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र वाटप*

पुणे : आपल्या मुलाला एकू येत नाही, हे समजताच पालक पूर्णपणे खचून जातात. त्याचे आयुष्य इथेच संपले असे त्यांना वाटू लागते. परंतु त्यांना योग्य वेळेत योग्य उपचार दिले तर त्यांचे आयुष्य देखील इतरांप्रमाणे सर्वसामान्य असेल. त्यासाठी योग्य वेळेत ते कळले देखील पाहिजे, म्हणून श्रवणदोषाकरिता जितकी गरज उपचारांची असते तितकीच गरज जनजागृतीची देखील असते, असे मत प्रख्यात गायिका कविता पौडवाल यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई व ओएनजीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल ११० मूकबधिर मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. यावेळी ओएनजीसी कंपनीचे कार्यकारी संचालक विजयराज, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, राजाभाऊ घोडके, विलास रासकर आदी उपस्थित होते. सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत.
 
विजयराज म्हणाले, समाजात तळागाळातील गरजू व्यक्तींच्या काय गरजा आहेत हे ओळखून त्यांच्या पर्यंत ती मदत पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. या मुलांनी श्रवणयंत्र घातल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील हास्य पाहून खूप आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.  


Comments

Popular posts from this blog

भारतरत्न सचिन तेंडूलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे सदिच्छादूत / ब्रँड ॲम्बेसेडरचितळे बंधू मिठाईवाले यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा