महाराष्ट्रीय मंडळ आंतरशालेय मैदानी स्पर्धा !!समर्थ कर्वे, वरद जाधव यांना अव्वल क्रमांक मिळवत सुवर्णपदक



पुणे, २८ जानेवारीः महाराष्ट्रीय मंडळाच्यावतीने आयोजित आंतरशालेय मैदानी स्पर्धेच्या लांब उडी प्रकारात समर्थ कर्वे आणि वरद जाधव यांनी अनुक्रमे १० आणि १२ वर्षाखालील गटाचे अव्वल क्रमांक मिळवत सुवर्णपदक संपादन केले.

मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या १० वर्षाखालील मुलांच्या लांब उडी प्रकारात समर्थ कर्वे याने ३.८० मीटर उडी मारून पहिला क्रमांक मिळवला. श्रेयस पन्हाळकर याने (३.७५ मी) दुसरा तर, विश्वजीत जगदाळे व वरद खाडे यांनी विभागून (३.७२ मी.) तिसरा क्रमांक मिळवला.

१२ वर्षाखालील मुलांच्या लांब उडी प्रकारात वरद जाधव याने ४.२५ मीटर उडी मारून पहिला क्रमांक मिळवला. कौस्तुभ कदम (४.१८ मी) याने दुसरा तर, ऋग्वेद भोपाटे (४.०४ मी.) याने तिसरा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेमध्ये ३५ शाळांतील ६५० खेळाडूंनी सहभागी झाले आहेत. यामध्ये ८ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांसाठी ५० मी. धावणे, ५० मी. लांब उडी, रिले शर्यत, १० वर्ष वयोगटासाठी ८० मी. धावणे, लांब उडी, रिले शर्यत, १२ वर्ष वयोगटासाठी १०० मी. धावणे, लांब उडी, रिले धावणे या क्रीडाप्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या खेळाडूंना मेडल्स्‌‍ आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः (पहिला, दुसरा, तिसरा, शाळा, वेळ या क्रमानुसार)ः
१० वर्षाखालील मुलेः लांब उडीः
समर्थ कर्वे (डी.एन.एन. दस्तुर शाळा, ३.८० मी);
श्रेयस पन्हाळकर (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लिश मिडीयम टिळक रोड, ३.७५ मी);
विश्वजीत जगदाळे (मुक्तांगण शाळा, ३.७२ मी.);
वरद खाडे (मुक्तांगण शाळा, ३.७२ मी.);

१२ वर्षाखालील मुलेः लांब उडीः
वरद जाधव (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लिश मिडीयम टिळक रोड, ४.२५ मी);
कौस्तुभ कदम (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लिश मिडीयम टिळक रोड, ४.१८ मी);
ऋग्वेद भोपाटे (मुक्तांगण शाळा, ४.०४ मी.)

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक