राष्ट्रवादीने साजरी केली "काळी दिवाळी" शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन
अतिवृष्टीच्या अस्मानी संकटाने व फसव्या मदतीच्या सुलतानी संकटाने महाराष्ट्रातील शेतकरी बेजार आहेत. सरकारने स्वतः निवडणुकीच्या प्रचारात "सरसकट कर्जमाफी" करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांची मते घेऊन सत्तेत आलेल्या सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. अतिवृष्टीमुळे पिकांसह अक्षरशः मातीही वाहून गेलेली असताना सरकारने निव्वळ आकड्यांची धुळफेक करत शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली आहे.
ऐन दिवाळीत संकटात सापडलेल्या आपल्या बळीराजाचा आवाज बनून आपण सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे. म्हणूनच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे निषेधात्मक "काळी दिवाळी" साजरी करण्यात आली. या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह माजी आमदार श्री. अशोक पवार, जिल्हाध्यक्ष श्री. देवदत्त निकम, श्री. विजय कोलते, माजी आमदार श्री. जगन्नाथ शेवाळे, माझी शहराध्यक्ष श्री. रविंद्र माळवदकर, श्री. उदय महाले, वंदना मोडक, रमीज सय्यद, मनाली भिलारे, किशोर कांबळे, सुलक्षणा शीलवंत, मजहर मणियार, श्री. पंडित कांबळे, श्री. अमोल परदेशी, श्री. शेखर ढवळे, दिपाली कवडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment