मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

एअरटेल च्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं,मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल,हिंदू सणांना सुट्टी न देणे,तसेच गेले ३ महिने सदर मराठी पोरांचा पगार केला नाही आणि त्यावर त्या कामगारांनी मनसे कडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे म्हणून त्या "शाहबाद अहमद" ने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कोनसी भी सेना लेके आओ,नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय. ह्या आपल्या मराठी पोरांच्या अन्यायाला आज मनसे स्टाईल वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील ३ एअरटेल ऑफिस फोडून टाकणार हा शेवटचा अल्तीमेटम मनसे कडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे,यावेळी मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोज खराबी,तुषार मोरे, महाराष्ट्र सैनिक व एअरटेल मराठी कामगार वर्ग उपस्थित होता.
मराठी वर अन्याय खपवून घेतला जाणार नाहीच हा थेट इशारा सर्व पुण्यातील आस्थापना व कार्यालयांना मनसेचा आहे याची नोंद घ्यावी. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा