कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने आपले भारतातील पहिले शोरूम पुणे येथे सुरू केले

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने आपले भारतातील पहिले शोरूम पुणे येथे सुरू केले

पुणे, महाराष्ट्र, 16 ऑक्टोबर 2025: सुप्रसिद्ध कायनेटिक समूहाची इलेक्ट्रिक वाहनांची शाखा कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने आपल्या भारतातील पहिल्या खास डीलरशिपच्या उद्घाटनाची सहर्ष घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे हे उद्घाटन करण्यात आले. ही ऐतिहासिक 3S (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स) सुविधा हा कंपनीच्या EV प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून ही सुविधा शाश्वत मोबिलिटी व ग्राहक सहभागाच्या नव्या युगासाठी मंच तयार करते.

दुकान नंबर 2, गल्ली नंबर 11, विश्रांतवाडी एअरपोर्ट रोड, टिंगरे नगर, पुणे- 411006 येथील या डीलरशिपचे मालक आणि संचालक श्री. रवींद्र शरद भेळके आहेत. 1400 चौ. फुट क्षेत्रफळात पसरलेले हे नवीन शोरूम म्हणजे आपला 50 वर्षांचा वारसा आणि आधुनिक डिझाईन व टेक्नॉलॉजी यांची सांगड घालण्याच्या कायनेटिकच्या व्हिजनचे मूर्त स्वरूप आहे. ही जागा एक प्रीमियम आणि ग्राहक-केंद्रित अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली असून त्यामधून इनोव्हेशन, विश्वास आणि सहजप्राप्यता याबाबतची कायनेटिकची वचनबद्धता झळकते. त्याला आणखी बळकटी देण्यासाठी दुकान नं. 90, तिरूपती रिगालिया 2, आनंद पार्क, धनोरी, पुणे – 411015 येथे 1050 चौ. फुट क्षेत्रफळात पसरलेली, सर्व्हिस सुविधेसाठी समर्पित ‘कायनेटिक लॅब’ देखील आहे. हा अत्याधुनिक सर्व्हिस सेटअप व्यापक आफ्टर-सेल्स साहाय्य सुनिश्चित करतो आणि ग्राहकांना निर्बाध स्वामित्व आणि विश्वासार्ह सर्व्हिस मानके प्रदान करतो.

या प्रसंगी बोलताना कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लि. चे उपाध्यक्ष आणि मॅनिजिंग डायरेक्टर श्री. अजिंक्य फिरोदिया म्हणाले, “आम्ही भारतात आमचे पहिले खास EV शोरूम सुरू केले हा कायनेटिकसाठी एक अभिमानाचा आणि निर्णायक क्षण आहे. पुणे पहिल्यापासून आमच्यासाठी खास आहे. येथेच आमच्या वारशाची सुरुवात झाली आणि आता इथेच आमच्या EV प्रवासाला आकार मिळत आहे. ही सुरुवात हा केवळ रिटेल टप्पा नाही, तर भारतासाठीच्या सहजप्राप्य, आकांक्षा-प्रेरित आणि शाश्वत इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.”

वर्दळीच्या आणि सहज पोहोचता येईल अशा मोक्याच्या ठिकाणी असलेले हे शोरूम EV प्रेमींसाठी एक प्रिय स्थान बनू शकते. येथे ग्राहकांना इनोव्हेशन, विश्वसनीयता आणि शाश्वततेवरील या ब्रॅंडचा फोकस प्रतिबिंबित करणाऱ्या वातावरणात कायनेटिकच्या विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर रेंजचा अनुभव घेण्याची संधी मिळते. या महत्त्वाच्या टप्प्यासह कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लि. अधिकृतरित्या आपल्या राष्ट्रीय रिटेल प्रवासाची सुरुवात करत आहे. आगामी काही महिन्यांत काही मोठ्या शहरांमध्ये इतरही शोरूम्स उघडण्याची त्यांची योजना आहे.
आपला दृष्टिकोन व्यक्त करताना कायनेटिक EV विश्रांतवाडीचे डीलर प्रिन्सिपल श्री. रवींद्र भेळके म्हणाले, “भारतातील प्रथम कायनेटिक EV डीलर बनणे हे गौरव आणि जबाबदारीची जाणीव देणारे आहे. मी लहानपणापासून लोकांचा कायनेटिक नावावर किती विश्वास आहे, हे पाहिले आहे. आणि आता, त्यांचे इलेक्ट्रिक भविष्य पुण्यात घेऊन येताना मला अभिमान वाटत आहे. हे शोरूम आणि आमचे समर्पित सर्व्हिस सेंटर यासह आमचे लक्ष्य प्रत्येक ग्राहकाला उत्कृष्ट, पारदर्शक आणि विश्वसनीय अनुभव देण्याचे आहे, मग तो ग्राहक आपली पहिली EV खरेदी करणारा असो किंवा पारंपरिक स्कूटरनंतर आता अपग्रेड होणारा असो.”
नवी कायनेटिक EV रेंज प्रसिद्ध कायनेटिक DX ला एक आधुनिक, व्यावहारिक आणि कुटुंबासाठी अनुकूल इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात पुन्हा सादर करत आहे. मजबूत मेटल बॉडी, प्रशस्त फ्लोरबोर्ड आणि या सेगमेन्टमधील श्रेष्ठ 37-लीटर सीटखालील स्टोरेज ही वैशिष्ट्ये असणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर मूळ गाडीचा सगळ्यांचा आवडता DNA कायम ठेवून आजच्या शहरी जीवनशैलीसाठी टी अनुकूल व्हावी या दृष्टीने बनवण्यात आली आहे.

या लाइन-अप मध्ये दोन व्हेरियन्ट आहेत – कायनेटिक DX आणि कायनेटिक ZX (पूर्वीची DX+), या दोन्हीमध्ये एक दमदार 2.6 KWh रेंज X LFP बॅटरी आहे, जी NMC- आधारित स्कूटर्सच्या तुलनेत चौपट जास्त चालते, यामुळे अधिक चांगली सुरक्षा आणि विश्वसनीयता सुनिश्चित होते. इतर मुख्य फीचर्स आहेत- K-कोस्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स असिस्ट आणि हिल-होल्ड असिस्ट. यात तीन राईड मोड आहेत: रेंज, पॉवर आणि टर्बो.

ZX व्हेरियन्ट टेलीकायनेटिक अॅपमार्फत स्मार्ट कनेक्टिव्हिटी देते. त्यामध्ये रियल-टाइम राईड डेटा, जिओ-फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट आणि “फाइंड माय कायनेटिक” ट्रॅकिंग आहे. माय कायनी व्हॉईस अलर्ट्स सह या स्कूटरला एक स्नेहपूर्ण व्यक्तिमत्व बहाल करण्यात आले आहे. ही स्कूटर चालकाला भेटते, सुरक्षिततेबाबत सल्ला देते आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देते. एक कायनेटिक असिस्ट स्विच तत्काळ CRM कनेक्ट शक्य बनवतो, तर म्युझिक आणि व्हॉईस नेव्हीगेशन सारखी ब्लूटुथ फंकशन्स सुविधा वाढवतात.

कायनेटिक DX ची किंमत 1,11,499 रु. आहे, तर कायनेटिक ZX (पूर्वीची DX+) ची किंमत 1,17,499 रु. आहे (दोन्ही किंमती एक्स-शोरूम, पुणे आहेत). ZX पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे- लाल, निळा, सफेद, सिल्व्हर आणि काळा. DX व्हेरियन्ट सिल्व्हर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा