विनझो (WinZO), आयईआयसी (IEIC) आणि बिझनेस फिनलंड (Business Finland) यांची भारत-फिनलंड गेमिंग समन्वय वाढवण्यासाठी आणि ‘मेड इन इंडिया’ निर्यातक्षम आशय तयार करण्यासाठी भागीदारी


विनझो (WinZO), आयईआयसी (IEIC) आणि बिझनेस फिनलंड (Business Finland) यांची भारत-फिनलंड गेमिंग समन्वय वाढवण्यासाठी आणि ‘मेड इन इंडिया’ निर्यातक्षम आशय तयार करण्यासाठी भागीदारी

 

फिनलंडच्या जागतिक दर्जाच्या गेमिंग कौशल्याचा लाभ घेत भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या गेमिंग बाजारपेठेला एकत्र आणून भारतातून नाविन्यपूर्ण, निर्यातक्षम गेमिंग अनुभव निर्माण करण्याचे या भागीदारीचे उद्दिष्ट

 

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025: व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन यासाठी असलेली फिनलंडची अधिकृत सरकारी संस्था बिझनेस फिनलंड इन इंडिया आणि भारतातील सर्वात मोठा इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म विनझो (WinZO) आणि कन्झ्युमर टेक क्षेत्रातील अग्रगण्य ना-नफा थिंक-टॅंक इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट अँड इनोव्हेशन कौन्सिल (IEIC) यांनी भारत-फिनलंड गेमिंग क्षेत्रातील संबंध बळकट करण्यासाठी ऐतिहासिक सहकार्य जाहीर केले आहे. ही भागीदारी फिनलंडच्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक गेमिंग क्लस्टर, कौशल्य विकास आणि जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध गेमिंग टायटल्स निर्माण करण्यातील यशातून शिकून भारताच्या वेगाने वाढणाऱ्या गेमिंग परिसंस्थेसोबत निर्यातीच्या दृष्टीने सहकार्याच्या संधी शोधेल. या सहयोगाचा पहिला टप्पा म्हणून भागीदारांनी नवी दिल्लीतील फिनलंड दूतावासात तपशीलवार केस स्टडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून भारतातील स्टेकहोल्डर्सना प्रेरणा मिळू शकेल.

 

फिनलंडने जगातील सर्वात यशस्वी गेमिंग अर्थव्यवस्थापैकी एक म्हणून स्थान मिळवले असून वार्षिक 3.9 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त महसूल निर्माण केला जातो. त्यातील तब्बल 98% निर्यातीमधून येतो. अॅंग्री बर्ड्स (रोव्हिओ) आणि क्लॅश ऑफ क्लॅन्स (सुपरसेल) सारख्या वैशिष्ट्यपूर्ण गेम्सनी फिनलंडला मोबाइल-फर्स्ट, कॅज्युअल गेमिंग इनोव्हेशनसाठी जागतिक मापदंड म्हणून प्रस्थापित केले आहे. या यशामागे प्रगत सरकारी धोरणे, गेम डिझाईनमधील उत्कृष्ट शिक्षण आणि बिझनेस फिनलंड सारख्या संस्थांद्वारे झालेली दीर्घकालीन सार्वजनिक गुंतवणूक आहे. आज, जगभरातील एक अब्जांहून अधिक खेळाडूंनी फिनलंडमध्ये विकसित केलेल्या गेम्सचा अनुभव घेतला आहे. केवळ 5.6 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशासाठी ही एक विलक्षण कामगिरी आहे.

 

भारतामध्ये 600 दशलक्षपेक्षा जास्त गेमर्स असून जागतिक मोबाइल गेम अॅप डाउनलोड्सचे प्रमाण जवळपास 20% आहे. त्यामुळे भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट बाजारपेठ बनली आहे. वैविध्यपूर्ण खेळाडूंचा बेस, उत्कट कंटेंट क्रिएटर कम्युनिटी आणि वाढता डेव्हलपर सहभाग यामुळे भारत फिनलंडच्या मार्गाने प्रेरित होऊन, जागतिक एक्सपोर्टसाठी स्थानिक IPs तयार करत आहे. फिनलंडच्या यशातून शिकून जागतिक गेमिंग इनोव्हेशन मधील प्रमुख निर्यातदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे हे आधीच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गेमिंगचे केंद्र असलेल्या भारताचे पुढचे लक्ष्य आहे.

भारतामधील फिनलंडचे राजदूत किम्मो लाहदेविर्टा म्हणाले, “फिनलंडने एकूण उलाढाल यादृष्टीने युरोपमधील अग्रगण्य गेम्स हब म्हणून आपले स्थान टिकवले आहे आणि आमची गेमिंग इंडस्ट्री जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. गेमिंग क्षेत्रात, भारताची स्केल आणि फिनलंडची क्राफ्ट एकत्र आली तर ती एक उत्तम जोडी ठरते. फिनलंड गेमिंग IP ची भारतातील विश्वसनीय प्लॅटफॉर्म पार्टनर्सद्वारे भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची वाढती क्षमता बघून आम्हाला आनंद होत आहे.”

 

IAS माजी सचिव, भारत सरकार आणि IEIC अध्यक्ष रोहित कुमार सिंग म्हणाले: “ही भागीदारी भारत आणि फिनलंड यांच्यात एक मजबूत पूल बांधण्याची अद्वितीय संधी आहे. फिनलंडच्या अनुभवातून भारताला अमूल्य धडे मिळतात आणि स्टार्टअप्स, डेव्हलपर्स आणि क्रिएटर्सना जागतिक प्रभाव साध्य करण्यासाठी सक्षम करतील असे एकत्रितपणे आपण नाविन्यपूर्ण कॉरिडॉर तयार करू शकतो. इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट आजच्या जगात शिक्षण, आरोग्यसेवा आणि कथा सांगण्यासाठी एक प्रभावी साधन बनले आहे. आमची परिसंस्था नाविन्यपूर्णतेला आकार देत असताना आम्ही आमच्या संबंधांचा आणि इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंटच्या शक्तीचा मोठ्या हितासाठी उपयोग करू शकतो. IEIC भारतातून निर्यातक्षम गेम्स आणि एक समृद्ध ईस्पोर्ट्स इकोसिस्टम उभारण्याच्या ध्येयावर आहे आणि ही भागीदारी त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी खूप उपयुक्त ठरेल.”

 

विनझो (WinZO) चे सहसंस्थापक पावन नंदा म्हणाले, “भारताकडे इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंटमध्ये जागतिक नेता होण्यासाठी लागणारे विस्तार, विविधता आणि सर्जनशीलता असे सर्व घटक आहेत. विनझो मध्ये आम्ही नेहमीच सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत, मोबाईल फर्स्ट, खिळवून ठेवणारा आणि vernacular IP निर्मितीने चालना मिळणाऱ्या भारताच्या विकास गाथेवर विश्वास ठेवला आहे. मग ते ईस्पोर्ट्स असो किंवा मायक्रोड्रामा. फिनलंडच्या सिद्ध एक्सपोर्ट मॉडेलमधून प्रेरणा घेऊन, हे सहकार्य जागतिक पातळीवरील ग्राहकांसाठी सर्वसमावेशक आशय तयार करण्याच्या भारताच्या प्रवासाला गती देईल.”

ही दूरदृष्टीपूर्ण भागीदारी दोन्ही देशांदरम्यान ज्ञान आणि कौशल्य यांचे शक्तिशाली आदानप्रदान सुलभ करेल. त्यामुळे क्रॉआंतरराष्ट्रीय भागीदाऱ्या, नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश, इन्व्हेस्टर व्हॅल्यू यासाठी संधी निर्माण होतील. शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण व सामाजिक हित अशा क्षेत्रांमध्ये गेमिंगच्या भूमिकेचे सह-निर्मित उपक्रम आकाराला येतील. याहूनही महत्त्वाचे म्हणजे सरकार, नियामक मंडळ आणि इंडस्ट्री लीडर्स यांच्यात सुसंबद्ध संवादासाठी जागा निर्माण होईल. त्यामुळे इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंटमध्ये नाविन्यपूर्णता आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकतेला आधार मिळेल.

भारत आणि फिनलंड यांच्यात स्टार्टअप्स, डेव्हलपर्स आणि क्रिएटर्सना सीमापार सहकार्य करण्यास, धाडसी प्रयोग करण्यास आणि जागतिक स्तरावर सुसंगत बौद्धिक संपत्ती (IP) तयार करण्यास सक्षम करेल असा एक शाश्वत व नाविन्यपूर्ण पूल बांधणे ही या उपक्रमाची मध्यवर्ती कल्पना आहे. फिनलंडच्या गेमिंग उत्कृष्टतेच्या परंपरेला भारताच्या विस्तार आणि सांस्कृतिक खोलीसोबत जोडून, ही भागीदारी जागतिक गेमिंग व इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रात सामायिक ज्ञान, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता या द्वारे एक नवा जागतिक नेतृत्वाचा मापदंड प्रस्थापित करण्याची आकांक्षा बाळगते.


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा