भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
*भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
पुणे दि.२९ : भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली.
यावेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा व भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या अध्यक्षा विजयमाला कदम, डॉ. मंदाकिनी पानसरे, उपाध्यक्ष डॉ.बी.एन.पवार, ज्येष्ठ संचालक व.भा. म्हेत्रे, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप उपस्थित होते.
डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, बाजारपेठेत इतरांपेक्षा ग्राहकांना वाजवी दरात अधिक दर्जेदार सेवा कशी देता येईल यासाठी पदाधिकाऱ्यांनी नेहमी जागरूक राहून तशी ध्येय धोरणे ठरवायला हवीत. अन्यथा तुमची जागा दुसरा स्पर्धक घेईल. त्यासाठी सर्वांनी दोन पावले पुढे असायला हवे. प्रत्येक गोष्टीत कात टाकून काम करायला पाहिजे.
डॉ. पवार यांनी भांडाराच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील ध्येय धोरणांवर चर्चा केली. याप्रसंगी वर्षभरात अधिकाधिक खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकांचा अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या हस्ते पैठणी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक जगन्नाथ शिंदे यांनी अहवाल वाचन केले. प्रास्ताविक डॉ. बी. एन. पवार यांनी केले तर आभार प्रा.राजेंद्र उत्तुरकर यांनी मानले. यावेळी सर्व संचालक, पदाधिकारी आणि ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment