पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये नृत्यातून आदिशक्तीचा लोकजागर* *नृत्याच्या माध्यमातून आदिशक्तीचा लोकजागर*
*पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये नृत्यातून आदिशक्तीचा लोकजागर*
*नृत्याच्या माध्यमातून आदिशक्तीचा लोकजागर*
पुणे – पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने गेल्या ७ दिवसांपासून लोकमान्यनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर प्रस्तुत "रूपानं देखणी" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात नृत्याच्या माध्यमातून आदिशक्तीचा लोकजागर करण्यात आला. देवीची वेशभूषा परिधान करून मंचावर देवीचा जागर करण्यात आला. सदरील कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देवून आदिशक्तीच्या रुपाची "याची देही याची डोळा" अनुभूती घेतली.
सातपुते म्हणाले की, महिलांना जिजाऊच्या लेकी म्हणतात ते उगीच नाही. जिजाऊने अपार कष्ट करून आपल्या संस्काराने व निष्ठेने शिवबा घडवला. शिवबाने स्वराज्याच्या निर्मितीचा ध्यास घेत तडीस नेला. आईची माया रुपी ताकदच या कामी आली. आज तंत्रज्ञानाची पाऊले विकासाकडे झपाट्याने चालली आहे. याच तंत्रज्ञान विकासामध्ये स्री ही झपाट्याने आपला सहभाग नोंदवत आहे. आपली कुटुंब व्यवस्था सांभाळत आज देशाच्या विकासात आपली प्रमुख भूमिका बजावतांना दिसत आहे.
आज व्यवसायामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद -भाव मुळातच कमी होऊ लागला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे देशाचे रक्षण कार्य, अभियंता, डॉक्टर, वकील व शिक्षण यात महिला या मोठ्या जिगरीने आपला सहभाग नोंदवित असतांना एक उत्तम गृहिणी म्हणूनही आपले कर्तव्य पार पाडीत आहे आणि हे केवळ आणि केवळ माता जगदंबेच्या आशीर्वादानेच होत आहे यात शंका नाही. अशा भावना पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी व्यक्त केल्या. यावेळी उत्सव प्रमुख डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक शुभांगी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment