*ज्ञानदा प्रतिष्ठान संचलित ज्ञानदा तंत्रशिक्षण केंद्र*
*ज्ञानदा प्रतिष्ठान संचलित ज्ञानदा तंत्रशिक्षण केंद्र*
पुणे
ज्ञानदा प्रतिष्ठान संचलित ज्ञानदा तंत्रशिक्षण केंद्र येथे अत्याधुनिक इलेक्ट्रीकल लॅबचे उद्घाटन सोहळा आज गुरुवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष उदयन पाठकयांच्या हस्ते झाले.प्रमुख अतिथी म्हणून सेवा सहयोग च्या धनश्री देशपांडे यांची उपस्थिती होती.
लॅबच्या उद्घाटनानंतर विवेक जोशी आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी व भविष्यातील प्रगतीविषयी मार्गदर्शन केले.
नवीन शिक्षण पद्धतीतील ( NEP) अभ्यासक्रमा अंतर्गत हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. लॅबमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळून रोजगाराभिमुख शिक्षणाची दिशा मिळेल, असे समाधान व्यक्त करण्यात आले तसेच अत्यंत माफक फी मध्ये वरील इलेक्ट्रीकल प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह मंदार शेंडे यांनी जाहीर केले. ह्या प्रशिक्षणाचा लाभ संस्थेतील तसेच परिसरातील अन्य शाळेतील विद्यार्थांनी/ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
विनायक जोशी,मंदार शेंडे, सत्यजित चितळे,माणिक कुलकर्णी,बापू गोहाड तसेच मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, प्रशिक्षक कडूसकर इ.यांची मुख्य उपस्थिती होती.
या वेळी ज्ञानदा प्रतिष्ठानचे पदाधिकारी,शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment