लोककथा नाट्य स्पर्धेतून उलगडल्या पौराणिक कथा* श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यमिकने पटकाविला प्रथम क्रमांक
*लोककथा नाट्य स्पर्धेतून उलगडल्या पौराणिक कथा*
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यमिकने पटकाविला प्रथम क्रमांक
पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये पौराणिक कथांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्या कथांमधील एकलव्याची गुरुभक्ती... गोरा कुंभाराची विठ्ठलभक्ती आणि भ्रष्टाचारासारख्या आधुनिक राक्षसाचा वध अशा अनेक कथा नाट्य स्पर्धेतून उपस्थितांसमोर उलगडल्या. विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यमिक शाळेने यामध्ये प्रथम क्रमांक मिळावीत विजेतेपद पटकाविले.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित लोककथा नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी महालक्ष्मी मंदिरात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील ५० शाळांनी भाग घेतला होता. त्यापैकी अंतिम ४ शाळांचे सादरीकरण मंदिरात करण्यात आले. यावेळी संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, विश्वकर्मा विद्यालय संचालिका मधु शितोळे, विश्वकर्मा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलभा देशमुख, सुनंदा सरडे यांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यमिक यांना रोख ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पुष्पा इंटरनॅशनल स्कूल यांना रोख ७ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक रोख ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.मृणाल अन्नदाते, संजय जोशी, रवींद्र सातपुते, अपूर्वा भिलारे, माया कुरुळेकर, डॉ. राधाकृष्ण बटुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सहिंद्रे यांनी केले.
Comments
Post a Comment