भारतातील तरुणाईकडे अपार क्षमता: डॉ. अभय जेरे*भारतातील तरुणाईकडे अपार क्षमता असून प्रयोगशीलता,



*भारतातील तरुणाईकडे अपार क्षमता: डॉ. अभय जेरे*
भारतातील तरुणाईकडे अपार क्षमता असून प्रयोगशीलता, कल्पकता व चिकाटीच्या आधारावर त्यांनी उद्योजकतेच्या नव्या वाटा निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. जेरे यांनी धोरणात्मक संधी, शासकीय सहाय्य, निधी उपलब्धता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच अपयशातून शिकण्याचे महत्त्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळ्या व उदाहरणांवर आधारित उत्तरे देऊन दिशा दाखवली असे अभय जेरे, उपाध्यक्ष, एआयसीटीई, नवी दिल्ली आपले मनोगत व्यक्त केले. पुढे डॉ. जेरे यांनी जागतिक घडामोडींचा संदर्भ देत सांगितले की, “नवोपक्रमाशिवाय प्रगती शक्य नाही”. गिग इकॉनॉमी, डिजिटल प्लॅटफॉर्म, फ्रीलान्सिंग व ऑन-डिमांड सेवांमुळे उद्योजकतेस नवीन दिशा मिळत असून कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याची संधी तरुणांना उपलब्ध होत आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच कौशल्य, ज्ञान आणि क्षमतांचा योग्य प्रचार करणे हे आजच्या काळातील यशाचे मुख्य सूत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे डॉ. मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, डीआयसीसीआय, यांनी आपल्या अनुभवातून प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी सांगितले की “उद्योजकता ही केवळ व्यवसाय न राहता सामाजिक परिवर्तनाचे सामर्थ्य ठरली पाहिजे”. त्यांनी स्पष्ट केले की पुणे हे महाराष्ट्राचे स्टार्टअप हब असून देशात अग्रस्थानावर आहे. येथील अनेक स्टार्टअप्स यशस्वीरीत्या कार्यरत असून त्यांनी उद्योगजगतात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की एआय व नवतंत्रज्ञानामुळे शिक्षक विरहित शिक्षण पद्धती तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र गुरु-शिष्य परंपरा कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. शिक्षकांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे गूगल किंवा एआयने दिलेल्या उत्तरांपेक्षा नेहमीच अधिक योग्य व परिणामकारक असते. त्यामुळे शिक्षकांसमोर गुगलवर तथ्य पडताळणी करणे हे अयोग्य असून अनादर दर्शवणारे आहे, असे ते म्हणाले. शिक्षक-विद्यार्थी नाते हे आश्रयदातृत्वावर नव्हे तर सहकार्य आणि भागीदारीवर आधारित असावे, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले. तसेच डिक्की नेक्स्टजेन - वाडिया कॉलेज चॅप्टर देखील लवकर सुरु करण्याची इच्छा त्यांनी दर्शविली
 “ट्रेंडी टॉक्स” मालिकेचा उद्देश तरुणांना संवाद, प्रबोधन आणि प्रेरणा देणे हा असून, या दुसऱ्या पर्वाने त्या ध्येयाला नवी दिशा आणि उंची दिली. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने नाविन्य, प्रेरणा आणि उद्योजकीय क्षमतेचा उत्सव ठरला. डीआयसीसीआय नेक्स्टजेन आणि नौरोसजी वाडिया कॉलेज यांच्या संयुक्त प्रयत्नातून झालेले हे आयोजन विद्यार्थ्यांसाठी व तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरले. उद्योजकीय विचारसरणीला चालना देणे, नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे या उद्देशाने डीआयसीसीआय नेक्स्टजेन आणि नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “ट्रेंडी टॉक्स #2 – एम्पॉवरिंग आंत्रप्रेन्युरशिप थ्रू इनोव्हेशन” हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील टाटा असेंब्ली हॉल, नौरोसजी वाडिया कॉलेज येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, तरुण उद्योजक, संशोधक, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी, शैक्षणिक अधिकारी तसेच लघुउद्योग क्षेत्राशी संबंधित घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या परिषदेमुळे उद्योजकतेसंबंधी विचारांची देवाणघेवाण, नवीन संकल्पनांची ओळख आणि भविष्यकालीन दिशांचा वेध घेण्याची संधी मिळाली.


प्रा. सचिन सानप, विश्वस्त, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी यांनी स्वागतप्रास्ताविकात शिक्षण आणि उद्योजकता यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी संधी शोधण्यात धाडस दाखवावे आणि समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे समन्वयन कुणाल जगताप, संयोजक, डीआयसीसीआय नेक्स्टजेन (महाराष्ट्र) यांनी केले. समारोप सत्रात डॉ. वसंत चाबुकस्वार, प्राचार्य, नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे, यांनी आभारप्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक, विद्यार्थी, उद्योजक तसेच सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली ऊर्जा त्यांच्या भावी वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न, वक्त्यांची उत्तरे आणि अनुभवी तज्ज्ञांनी दिलेली दिशा यामुळे प्रत्येक सहभागी ज्ञानसमृद्ध झाला. शैक्षणिक संस्था आणि उद्योगजगताच्या सहकार्याने निर्माण होणाऱ्या संधींचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना घेता आला.


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा