डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून बँकेने वाटचाल करावी: डॉ.विश्वजीत कदम*भारती सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १२% लाभांश जाहीर

*डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून बँकेने वाटचाल करावी: डॉ.विश्वजीत कदम*

भारती सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १२% लाभांश जाहीर

पुणे दि.२९ : भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली चौथी आर्थिक महासत्ता असून बँकिंग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत या बदलाच्या गतीने भारती बँकेने डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून वाटचाल करायला हवी असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम, कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, भारती सहकारी बँकेचे अध्यक्ष सीए जयेश विजयकुमार दुधेडिया, उपाध्यक्ष डॉ.नितीन नायक, बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए बी.बी.कड, डॉ.एम.एस.सगरे, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, संजीव पाटील उपस्थित होते.
डॉ.कदम पुढे म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी भारती बँकेची स्थापना अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य माणसास अर्थसहाय्य करण्यासाठी केली आहे त्यामुळे आज समाजात सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख आहे. तसेच ग्राहकांना अद्ययावत सुविधा देऊन त्यांना समाधानी ठेवावे लागेल. बँकिंग क्षेत्रामधील चालूघडामोडीवर लक्ष ठेऊन आत्मपरीक्षण करून येणारी नवी आव्हाने पेलण्यासाठी आपण सर्वांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. बँकेचे अध्यक्ष दुधेडिया यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेऊन पुढील ध्येय धोरणांचा आराखडा मांडला. यावेळी बँकेच्या २३ शाखेतून उत्कृष्ट शाखा, अधिकारी, लेखनिक आणि शिपाई यांचा सन्मान करण्यात आला.
व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. भारती बँक ही मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक असून आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर बँकेचा व्यवसाय रु.२४१९.८७ कोटी असून ढोबळ नफा रु.२२.३८ कोटी तर निव्वळ नफा रु.१३.५८ कोटी झाला असून निव्वळ NPA शून्य टक्के राखण्यात बँकेने यश मिळविले असून गेल्या दोन वर्षांपासून १२% लाभांशाची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे. तसेच यावर्षीपासून बँकेने ग्राहकांना आय एम पी एस ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षणामध्ये बँकेने 'अ ' दर्जा प्राप्त केला आहे. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. संचालिका डॉ. ज्योती मंडलिक यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा