लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात नवरात्रोत्सव*श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना ; दररोज विविध कार्यक्रम


*लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात नवरात्रोत्सव*
श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना ; दररोज विविध कार्यक्रम

पुणे : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात नवरात्रोसव निमित्त श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली. दत्तमंदिरात दरवर्षी दत्तजयंती सह गणेशोत्सव व नवरात्रोत्सव सारखे विविध सण उत्साहात साजरे केले जातात.

दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, मंदिरात दररोज विविध भजनी मंडळांकडून भजन सेवा, श्री गणपती स्तोत्र, श्री दत्तात्रय यांचे स्तोत्र, श्री ललिता सहस्त्र नाम, श्री अन्नपूर्णा स्तोत्र, श्री दुर्गा स्तोत्र, दुर्गा ३२ नामावली, शिवाष्टक, ललिता सहस्त्र नाम पठण असे विविध कार्यक्रम होतात. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम देखील सुरु आहेत. कोजागिरी पौर्णिमेला सायंकाळी भाविकांना मसाला दूध प्रसाद देण्यात येतो.. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा