संकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उलरबांचा महामेरू विघ्नहर्ता गणरायाबा उत्सव म्हणजेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव या

संकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उलरबांचा महामेरू विघ्नहर्ता गणरायाबा उत्सव म्हणजेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव या गणेशोत्सवात पुण्यातील भोलेनाथ मित्र मंडळाचा ५७ वर्षाचा कालखंड यशस्वी पूर्ण झाला याचा मनस्वी आनंद होत आहे. आपण सगळे मिळून, उत्साहाने आणि भक्तीभावाने, बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहोत. श्री गणेशोत्सव हा उत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, तो आपल्या एकतेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. 
श्री गणेशाप्रती असलेल्या श्रद्धेने आपण गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊन शोभा वाढवता. मंडळाने मागीलवर्षी पांडवकालीन श्री अंबरनाथ मंदिराचा देखावा करण्यात आला होता. यावर्षी मंडळाने शिव शंकर, ज्यांना महादेव, भोलेनाथ, शंकर, आदिदेव, महेश, नीलकंठ अशा विविध नावांनी ओळखले जाते, हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देव आहेत. ते त्रिदेव (ब्रह्मा, विष्णू, महेश) पैकी एक आहेत आणि त्यांना सृष्टीचे संहारक मानले जाते. 
हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेलेले केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर (८.७ मैल) लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. याचे दर्शन आता सर्व शिवभक्तांना आपल्या पुणे शहरात होणार आहे. 
नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया – खूप स्तुती होत आहे, पुण्यनगरीत श्री केदारनाथचे दर्शन घडून आणल्याबद्दल आभार मानतात जे व्यक्ती आर्थिक किंवा नोकरी, घरगुती कामे यामुळे मुख्य केदारनाथ उत्तराखंड येथे दर्शनासाठी जाता येत नाही त्यांना आपल्या पुण्यात भोलेनाथाचे दर्शन होत आहे त्यामुळे पुणेकरांसह देखावे पाहण्यासाठी येणारे सर्वचजण मंडळाचे कौतुक करत आहेत. 
भोलेनाथ मित्र मंडळाचा थोडासा मागोवा घेतला तर हा गणेशोत्सव केळकर रोड वरील वाड्यात साजरा होत असे. पुणे शहराचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष मा.श्री.दीपकभाऊ मानकर यांनी या मंडळाचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर या मंडळाचा गणेशोत्सव सन १९९२ पासून मोठ्या स्वरूपात साजरा होऊ लागला. मा.श्री.दीपकभाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीतून धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा, ज्येष्ठ, पुरुष-महिला,तरुण-तरुणी-, विद्यार्थी-विद्यार्थिनी, लहान मुले यांसह सर्वच स्तरातील प्रत्येक घटकांना आवश्यक त्या बाबी उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयत्न भोलेनाथ मित्र मंडळ करत आहे व भविष्यातही करत राहणार आहे. त्यामध्ये अवयव दान, कॅन्सर निदान, नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी, दंतरोग तपासणी यासांरख्या मोफत आरोग्य तपासणी, भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना मदत कर्जत तालुक्यातील चारा छावणीतील जनावरांना हिरवा चारा, पशुखाद्य व पाण्याच्या टंकर, पाण्याच्या टाक्या मोफत उपलब्ध करून दिल्या, जगात चर्चा होते त्या आपल्या वारीची माऊलींच्या पायी वारीतील वारक-यांची सेवा करण्यात येते, वारीच्या दरम्यान असंख्य दिंडीना भोजन व्यवस्था, आरोग्य तपासणी, फळे वाटप केले जाते, पुणे शहरातील क्रांतिकारक,थोरपुरुष,हुतात्मे यांच्या पुतळ्यांची तसेच ऐतिहासिक गड-किल्ल्यांची स्वच्छता मंडळाकडून केली जाते, देशासाठी वीरमरण प्राप्त झालेल्यांच्या वीरपत्नी व वीरमाता यांचा गौरव समारंभ केला जातो, खेळाडूंसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा व मुष्ठीयुध्द स्पर्धा आयोजित करणे, क्रिकेट स्पर्धा, दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा, आदर्श अहवाल स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव, निर्माल्य संकलन असे नाविन्यपूर्ण समाजोपयोगी व जनप्रबोधन करणान्या कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या माध्यमातून करीत आहेत. समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन साधेपणाने व भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा करीत आहोत. भोलेनाथ मित्र मंडळाने एक असा उपक्रम राबविला होता ज्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे सन २०२० मध्ये करोनाचे संकट जगावर कोसळले असताना गेल्या साडेतीन ते चार महिन्यात त्याचा कहर झाला. समाजातील प्रत्येक घटकाला, परप्रांतीय कामगार, हातावर पोट असणारे कष्टकरी, शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी, मध्यमवर्गीय अशा सगळ्यानांच या संकट काळात मोठ्या आर्थिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी घरातील सख्खा नातेवाईक सुद्धा मदत करण्यासाठी येऊ शकत नव्हता. परीस्थी इतकी भयानक होती माणूस स्वतःचा विचार करत जगत होता.पण मा.श्री. दीपकभाऊ मानकर, मा.हर्षवर्धन दीपक मानकर, मा.करण दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीवा प्रतिष्ठान व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून करोना वॉरियर बनून लक्षणीय आणि प्रेरणादायी मदत कार्य केले होते. तसेच ससून हॉस्पिटल मधील डॉक्टर,नर्सेस, कर्मचारी, MPSC,UPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्या लोकांचा व्यवसायच बंद पडला, रस्त्यावरील पथारी यांच्यासह साधारण तीन लाख गरजवंतांना या माध्यमातून सलग चार महिने मोफत भोजन व्यवस्था केली, फळे वाटप, इंजेक्शन व औषधे उपलब्ध करून दिली, नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सहकार्य केले, सुमारे ४०० ते ५०० कोरोना वारियर या संपूर्ण कालावधीत झटत होते. हे कार्य जाण्याची धडपड करणान्यांना नवी उमेद आणि बळ देणारे होते.
केळकर रोडवर भोलेनाथाचा देखावा असला की हमखास भोलेनाथ मित्र मंडळाने केला असा ठाम विश्वास आहे. कारण मंडळाच्या नावाप्रमाणे दरवर्षी भोलेनाथाच्या ऐतिहासिक देखावा केला जातो.आतापर्यंत भोलेनाथ मित्र मंडळ मा.श्री.दीपकभाऊ मानकर याच्या नेतृत्वाखाली करीत असलेल्या वाटचालीमध्ये घेण्यात आलेल्या समाजोपयोगी उपक्रमाची दखल घेत विघ्नहर्ता न्यासचा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मंडळाने पटकावले आहे. 
आपण कोरोना सारख्या मोठ्या संकटातून बाहेर आलो आहे, सगळे उत्सव करताना आपापसात मतभेद विसरून एकत्र साजरा केला पाहिजे तसेच स्वच्छ पुणे सुंदर पुणे ठेवूयात 


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा