सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आपला सहा पट विस्‍तार करत २०२५ दरम्‍यान भारतातील २०,००० विद्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित करणार


 


सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आपला सहा पट विस्‍तार करत २०२५ दरम्‍यान भारतातील २०,००० विद्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित करणार



गुरूग्राम, भारत - सप्‍टेंबर ८, २०२५ - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज आपला प्रमुख सीएसआर उपक्रम 'सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस (एसआयसी)'च्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली, ज्‍यासह भारतातील तरूणांना भविष्‍यासाठी सुसज्‍ज कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यासोबत सरकारच्‍या डिजिटल इंडिया व स्किल इंडिया दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.

यंदा हा स्किलिंग उपक्रम २०२४ मधील चार राज्‍यांवरून १० राज्‍यांपर्यंत विस्‍तारित होईल. हा उपक्रम २०,००० विद्यार्थ्‍यांना २०२५ दरम्‍यान आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्‍ज (आयओटी), बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग अशा भावी तंत्रज्ञान कौशल्‍यांमध्‍ये अधिक कुशल करेल, ज्‍यामध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या ३,५०० विद्यार्थ्‍यांच्‍या तुलनेत सहा पट वाढ होईल. तंत्रज्ञान प्रशिक्षणाव्‍यतिरिक्‍त विद्यार्थ्‍यांना कामाच्‍या ठिकाणी सुसज्‍जता वाढवण्‍यासाठी सॉफ्ट स्किल्‍ससंदर्भात मार्गदर्शन देखील मिळेल, तसेच पात्र उमेदवारांना संबंधित उद्योगांमध्‍ये प्‍लेसमेंटसंदर्भात साह्य करण्‍यात येईल.

''सॅमसंगला भारतातील विकास प्रवासामधील दीर्घकालीन सहयोगी असण्‍याचा अभिमान वाटतो. भारत सरकारच्‍या स्किल इंडिया व डिजिटल इंडिया अभियानांशी संलग्‍न असलेल्‍या सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसमधून तरूणांना संधी देण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याचा आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसच्‍या माध्‍यमातून आम्‍ही भारतातील तरूणांना भविष्‍यासाठी सुसज्‍ज कौशल्‍यांसह सक्षम करत आहोत, त्‍यांना डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेसाठी आणि देशाच्‍या प्रगतीला गती देण्‍यासाठी सुसज्‍ज होण्‍यास मदत करत आहोत. आम्‍ही विशेषत: वंचित समुदायांमधील विद्यार्थ्‍यांसाठी स्किलिंग उपलब्‍धता व रोजगार संधी वाढवण्‍याकरिता, तसेच भारत सरकारच्‍या डिजिटली सक्षम भारत घडवण्‍याच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत,'' असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्‍हणाले.

व्‍याप्‍ती आणि सर्वसमावेशकतेवर धोरणात्‍मक लक्ष केंद्रित

सॅमसंगने उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील १०,००० विद्यार्थ्‍यांना उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमध्‍ये प्रशिक्षित करण्‍यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. टेलिकॉम सेक्‍टर स्किल कौन्सिल (टीएसएससी) सोबतचा दुसरा एमओयू या उपक्रमाला तामिळनाडू, दिल्‍ली, हरियाणा, पंजाब आणि महाराष्‍ट्रातील आणखी १०,००० विद्यार्थ्‍यापर्यंत विस्‍तारित करेल.

यंदा उत्तरप्रदेश व तामिळनाडू या राज्‍यांवर प्रमुख भर देण्‍यात येईल, जेथे प्रत्‍येक राज्‍यातील ५,००० विद्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञानांमध्‍ये प्रशिक्षण मिळेल. हा उपक्रम शहरी व अर्ध-शहरी भागांपर्यंत पोहोचत भावी तंत्रज्ञान कौशल्‍ये मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून खात्री मिळते की वंचित समुदाय भारताच्‍या डिजिटल परिवर्तनामध्‍ये मागे राहणार नाहीत. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) आणि टेलिकॉम सेक्‍टर स्किल कौन्सिल (टीएसएससी) या दोन्‍ही नॅशनल स्किल डेव्‍हलमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी)-मान्‍यताकृत संस्‍था त्‍यांचे मान्‍यताकृत प्रशिक्षण सहयोगी व केंद्रांच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून या उपक्रमाची अंमलबजावणी करतील. २०२२ मध्‍ये भारतात सुरू झाल्‍यापासून सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसने ६,५०० विद्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञानांमध्‍ये प्रशिक्षित केले आहे.

सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस: भारतात सीएसआरचा प्रमुख आधारस्‍तंभ

सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस सॅमसंगच्‍या व्‍यापक सीएसआर धोरणाचा भाग आहे, ज्‍यामध्ये सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो सारख्‍या उपक्रमांचा समावेश आहे, जो तरूणांना सामाजिक हितासाठी नाविन्‍यता आणण्‍यास आणि समस्‍या निवारण करणारे सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍यास प्रेरित करतो. एकत्रित, हे उपक्रम दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍यासाठी, सर्जनशीलतेला चालना देण्‍यासाठी आणि भारतातील भावी पिढीला तंत्रज्ञान-संचालित भविष्‍यामध्‍ये प्रगती करण्‍यास सुसज्‍ज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.



Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा