नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजकार्यासाठी उभारी : खासदार सुप्रिया सुळेबळीराजावरील संकट टाळण्यासाठी पुढाकार घेऊया : खासदार सुप्रिया सुळेश्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्री शक्तीचा जागर करत नवदुर्गांचा सन्मान
नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजकार्यासाठी उभारी : खासदार सुप्रिया सुळे
बळीराजावरील संकट टाळण्यासाठी पुढाकार घेऊया : खासदार सुप्रिया सुळे
श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्री शक्तीचा जागर करत नवदुर्गांचा सन्मान
पुणे : घराच्या चार भिंतीत न अडकता महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहेत. समाज सेवेतही आघाडीवर आहेत, मात्र त्याचा गवगवा न करता अव्याहतपणे समाजसुधारणेसाठी झटत आहेत. हे त्यांचे खऱ्या अर्थाने मोठेपण आहे. या महिलांच्या कार्यकर्तृत्वातून आम्हालाही कार्यरत राहण्यास उभारी मिळते, शिकायला मिळते, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट आले आहे, ते टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
भिलारेवाडी येथील श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्री शक्तीचा जागर करत नवदुर्गा पुरस्काराने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीला सन्मानित करण्यात आले. त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होत कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चामुंडा भवानी माताजी जैन मंदिर महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा कटारिया यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर, पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सुभाष नाहर, अंजली नाहर व्यासपीठावर उपस्थित होते.
रत्नप्रभा खाबिया (समाजसेवा), कमलाबाई कर्नावट (धार्मिक, सामाजिक), निना नाहर (आरोग्यसेवा), ममता नाहर (अवयवदान जागृती), सुषमा नाहर (समाजसेवा), रेश्मा नाहर (शैक्षणिक), सोनल गांधी (क्रीडा), पल्लवी भटेवरा (आरोग्य क्षेत्र), पूजा गडा (मानसिक आरोग्य) यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात राजेश नाहर यांनी मंदिराच्या स्थापनेविषयी माहिती देऊन. संस्थानतर्फे चालविणाऱ्या जाणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील उपक्रमांविषयी अवगत केले. घरातील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन स्त्री शक्तीचा जागर करण्याच्या काळात महिलांचा यथोचित सन्मान करावा या हेतूने या नवदुर्गांना गौरवित केले जात आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रत्ना दहिवेलकर यांनी केले.
फोटो ओळ : श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे रत्नप्रभा खाबिया यांचा गौरव करताना मान्यवर.
Comments
Post a Comment